ETV Bharat / state

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कात आलेले 29 जण क्वारंटाइन

author img

By

Published : Jun 16, 2020, 1:10 PM IST

कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील 52 जणांची यादी रेल्वे प्रशासनाने आरोग्य विभागाला दिली आहे. त्यापैकी 29 जणांचे स्वॅब (घशातील स्त्राव) तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 52 कर्मचाऱ्यांची यादी रेल्वे प्रशासनाने आरोग्य विभागाला दिली आहे. त्यातील 29 जणांचे स्वॅब (घशातील स्त्राव) तपासणीसाठी घेतले असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेच्या रोहा-कोलाड दरम्यानच्या मार्गावर सिग्नल व टेलिकम्युनिकेशन विभागात हा कर्मचारी काम करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कर्मचारी 9 जून रोजी रोहा ते कोलाड दरम्यान कोकण रेल्वेच्या सेवेत कार्यरत होता. त्याचवेळी रत्नागिरातील 2 ते 3 कर्मचारी तेथे कार्यरत होते. हे कर्मचारी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले होते. मात्र, त्याचा 13 जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कातील बेलापूर व कोलाडमधील कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ कोकण रेल्वे प्रशासनाकडून दक्षता घेत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या रत्नागिरीतील काही कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना कोकण रेल्वे प्रशासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल 52 जणांची यादी तयार करून ती आरोग्य विभागाला दिली आहे. यातील 29 जणांचे स्वॅब घेऊन या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 14 नव्या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 445 झाली आहे. त्यापैकी 308 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 120 कोरोनाग्रस्त (अॅक्टीव्ह) रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - हौसेला मोल नाही, 'ते' वापरतात चक्क चांदीचा मास्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.