ETV Bharat / state

रायगड : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैध दारू घेऊन दोघेजण अलीबागमध्ये येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांनी दोघांना अटक केली.

two person arrested for smuggling liquor in raigad
रायगड : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
author img

By

Published : Dec 5, 2020, 4:41 PM IST

रायगड - अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून डस्टर गाडी तसेच लाखोंचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात -

दोघेजण डस्टर गाडीमध्ये अवैध दारू घेऊन अलीबागमध्ये येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कार्लेखिंड येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबविता भरधाव वेगाने अलिबागच्या दिशेने गाडी पळवली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत पिंपळभाट येथे दोघांना ताब्यात घेतले.

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

गाडीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त -

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली गाडी आणि दोनही आरोपींना अलिबाग येथील कार्यालयात आणले. त्यानंतर गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये महागड्या कंपनीच्या दारूच्या बाटल्याचे 10 बॉक्स आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ही दारू दिव-दमन येथून आणल्याचे त्यांनी कबूल केले. ही दारू कोणासाठी आणण्यात येत होती, याबाबतचा तपास उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा - डोळ्यांवाटे कोविड संसर्ग टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सऐवजी वापरा चष्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.