ETV Bharat / state

सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला, लवकरच नवीन पुलाची निर्मिती करणार - अदिती तटकरे

सावित्री नदीवरील आंबेत पूल गेली वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद होता. त्याचे रविवारी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा पूल वाहतुकीसाठी औपचारीक पातळीवर खुला केल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

सावित्री नदीवरील आंबेत पुलाचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले

author img

By

Published : Jun 27, 2021, 5:43 PM IST

रायगड - रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पूलाचे उद्घाटन रविवारी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या ठिकाणी लवकरच नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला आहे. त्याला तातडीने मंजूरी मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

सावित्री नदीवरील आंबेत पुलाचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले

'कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या नारिकांची सोय'

हा पूल गेली वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद होता. आंबेत पूल रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली, मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे. तो धोकादायक झाल्याने वर्षभरापूर्वी त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असल्याने यावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे एस'टी महामंडळाच्या बसेस अभावी नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर पर्यायी जलमार्गाने रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, ही सेवा सर्वसामान्यांना न परवडणारी होती. दापोली, मंडणगड, व खेडकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाने वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे आंबेत पूल वाहतुकीसाठी लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने, रविवार हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

'बारा कोटी रूपये खर्च'

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या पुलाचे उद्घाटन केले. तसेच, हा पूल वाहतुकीसाठी औपचारीक पातळीवर वाहतुकीसाठी खुला केल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे, जिल्हापरिषद सदस्य बबन मनवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे नेते अजय बिरवटकर, आंबेतचे माजी उपसरपंच नवीद अंतुले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.