रायगड - कोरोनाच्या महामारीमुळे आठ महिन्यांपासून सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिल्याने सोमवार 23 नोव्हेबर पासून शाळा, कॉलेजची घंटा वाजणार आहे. रायगड जिल्ह्यातही पनवेल वगळता नववी ते बारावीची शाळा सुरू होत आहे. पण तत्पूर्वी शाळा, कॉलेज सॅनिटाईझ करण्याची लगबग सुरू आहे. तर शिक्षकांची कोरोना तपासणीही केली जात असली तरी फक्त 20 टक्केच शिक्षकांची तपासणी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारचा मुहूर्त टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगडमध्ये शाळा पुन्हा सुरू होण्याचा 23 चा मुहूर्त टळणार ? पालकांची द्विधा मनस्थिती - रायगडमध्ये पुन्हा शाळा सुरू
पनवेल वगळता रायगड जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतची शाळा सोमवारपासून सुरू होणार आहे. केवळ २० टक्केच शिक्षकांची कोविड तपासणी पूर्ण झाली असल्याने शाळा सुरू होण्याबाबत 23 चा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे.
![रायगडमध्ये शाळा पुन्हा सुरू होण्याचा 23 चा मुहूर्त टळणार ? पालकांची द्विधा मनस्थिती school will restart from monday in raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9626803-476-9626803-1606044504033.jpg?imwidth=3840)