ETV Bharat / state

२ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर उद्या रायगड भुषण पुरस्कार सोहळा; यादी मात्र गुलदस्त्यात - रायगड भुषण पुरस्कार

रायगड भुषण या पुरस्काराने गौरव करण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या यादीबाबत प्रशासनाला विचारले असता पुरस्कार वितरणावेळी कळेल असे सांगण्यात आले. मात्र, पुरस्कार प्राप्त व्यक्तींना जिल्हा परिषदेची निमंत्रण पत्रिका पोहोचली आहे. त्यामुळे पुरस्कार विजेत्यांची नावे अशी गुलदस्त्यात ठेवण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रायगड भुषण पुरस्कार
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:50 PM IST

रायगड - जिल्हा परिषदेच्या ‘रायगड भुषण’ या पुरस्कारबाबत सत्ताधारी व प्रशासनानी कमालीची गुप्तता पाळली आहे. जिल्ह्यात किती जणांना पुरस्कार दिले जाणार? याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासनाला विचारले असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शनिवारी या पुरस्कारांचे वितरण रोहा येथे करण्यात येणार आहे. २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर२०१७-१८ व २०१८-१९ चे रायगड भुषण पुरस्कार वितरण सोहळा होत आहेत. रायगड भुषण पुरस्काराची खिरापत वाटली जात असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही परत एकदा सुमार दिडशे पेक्षा जास्त जणांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे समजते आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीमत्वाला रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भुषण पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मात्र, ही यादी शंभरवर जावून पोहोचल्याने नागरीकांमधून नाराजीचा सुर उमटायला लागला होता.या कारणास्तव २ वर्ष हे पुरस्कार देण्याचे टाळले होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील १ ते २ व्यक्तींना पुरस्कार प्राप्त होतील व पुरस्काराची संख्याही कमी असेल असे वाटले होते. मात्र, यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही.
जिल्हा परिषदेला तरुण आणि नव्या दमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळाल्यानंतर यात बदल होईल असे वाटले होते. त्यातच गेली २ वर्ष हा पुरस्कारच दिला गेला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदापुरस्काराची खैरात वाटली जाणार असल्याचे समजते.

रायगड भुषण या पुरस्काराने गौरव करण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या यादीबाबत प्रशासनाला विचारले असता पुरस्कार वितरणावेळी कळेल असे सांगण्यात आले. मात्र, पुरस्कार प्राप्त व्यक्तींना जिल्हा परिषदेची निमंत्रण पत्रिका पोहोचली आहे. त्यामुळे पुरस्कार विजेत्यांची नावे अशी गुलदस्त्यात ठेवण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उद्या सकाळी ११ वाजता रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी शेकाप नेत्या मिनाक्षी पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसून आले.

Intro:(सदर बातमी आज किंवा उद्या सकाळी लावलीत तर बरे होईल, उद्या शनिवारी पुरस्कार आहेत)

दोन वर्षांनी रायगड भुषण पुरस्कार देत असताना यादी मात्र गुलदस्त्यात

पुरस्काराची खिरापतीची परंपरा कायम

जिल्हा परिषद प्रशासनाकडून यादी देण्यास टाळाटाळ

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या ‘रायगड भुषण’ या पुरस्कारबाबत सत्ताधारी व प्रशासन यांच्याकडून यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. जिल्ह्यात किती जणांना पुरस्कार दिले जाणार याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा व सामान्य प्रशासनला विचारले माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. शनिवारी या पुरस्कारांचे वितरण रोहा येथे करण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2017-18 व 2018-19 चे रायगड भुषण पुरस्कार वितरण सोहळा होत आहेत. रायगड भुषण पुरस्काराची खिरापत वाटली जात असल्याबाबतच्या बातम्या याआधी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही परत एकदा सुमार दिडशे पेक्षा जास्त जणांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे समजते आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीमत्वाला रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भुषण पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मात्र ही यादी शंभरवर जावून पोहचल्याने नागरीकांमधून नाराजीचा सुरु उमटायला लागले होते. या कारणास्तव दोन वर्षे हे पुरस्कार देण्याचे टाळले गेले होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील एक ते दोन व्यक्तींना पुरस्कार प्राप्त होतील व पुरस्काराची संख्याही कमी असेल असे वाटले होते. मात्र यात कोणताही बदल झालेला दिसत नाही.Body:जिल्हा परिषदेला तरुण आणि नव्या दमाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळाल्यानंतर यात बदल होईल असे वाटले होते. त्यातच गेली दोन वर्ष हा पुरस्कारच दिला गेला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा  पुरस्काराची खैरात वाटली जाणार असल्याचे समजते. यंदा दोन वर्षांचे मिळून दिडशे पेक्षा जास्त जणांना रायगड भुषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे समजते.

रायगड भुषण या पुरस्काराने ज्या सन्मानिय व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. त्या पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या यादीबाबत सामान्य प्रशासन व अध्यक्षा याना विचारले असता पुरस्कार वितरण वेळी कळेल असे सांगण्यात आले. मात्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना जिल्हा परिषदेची निमंत्रण पत्रिका पोहचली आहे. त्यामुळे पुरस्कार विजेत्यांची नावे अशी गुलदस्त्यात ठेवण्याचे प्रयोजन काय असा सवाल निर्माण झाला आहे.Conclusion:शनिवारी 9 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, शेकाप नेत्या मिनाक्षी पाटील, आ. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरुन समजून आले. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.