ETV Bharat / state

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी त्रिसुत्री नियमांचे पालन करा; रायगड जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

author img

By

Published : Nov 24, 2020, 4:12 PM IST

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे. तसेच, कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन खबरदारी घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.

District General Hospital Raigad News
जिल्हा सामान्य रुग्णालय

रायगड - कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसुत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यास आपण यशस्वी होऊ. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन खबरदारी घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.

माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने

रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून 56 हजार 256 बाधित आढळले होते. यापैकी 53 हजार 741 कोरोनामुक्त झाले आहेत. 1 हजार 517 जणांचा आठ महिन्यात मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 970 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे.

ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, औषधांचा मुबलक साठा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभावना असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहातात. त्यामुळे, या हंगामात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी रायगड जिल्हा प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी 2 टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर, माणगाव येथे 200 टन ऑक्सिजन साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.

केंद्राकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरेशन प्लांट मंजूर

ठाणे आरोग्य कक्षेत असलेल्या तीन जिल्ह्यापैकी रायगड, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन तयार करणारा जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जागेची पाहाणी केंद्राकडून केली जाणार आहे. त्यामुळे, लवकरच जनरेशन प्लांटही कार्यान्वित केला जाणार असल्याने, ऑक्सिजनची कमतरता जिल्ह्याला भासणार नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.

त्रिसूत्री नियमांचे पालन करा

कोरोनावर अद्यापही औषध, लस निघालेली नाही. लस येईपर्यत नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, तरच येणारी दुसरी लाट थोपवण्यात आपण यशस्वी होऊ, असे डॉ. सुहास माने यांनी सांगितले.

हेही वाचा - जिल्ह्यातील अनेक शाळेत आज घंटा वाजलीच नाही, शिक्षकांची कोविड तपासणी अजून अपूर्णच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.