ETV Bharat / state

दहीहंडी बांधलेला खांब कोसळल्याने एका गोविंदाचा मृत्यू, एक गंभीर; खालापूर तालुक्यातील घटना

रायगडमधील खालापूर तालुक्यात दहीहंडी बांधलेला सिंमेट खांंब कोसळल्याने एका गोविंदाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला. रायगडमध्ये शनिवारी दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत शुभम मुकादम
author img

By

Published : Aug 24, 2019, 11:43 PM IST

रायगड - दहीहंडी फोडल्यानंतर दहीहंडी बांधलेला सिमेंट विटांचा खांब कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील चौक नवीन वसाहत येथे घडली. रायगडात दिवसभरात 3 गोविंदांचा मृत्यू झाला आहे.

खांब कोसळल्याने एका गोविंदाचा मृत्यू

शुभम दत्तात्रय मुकादम (वय 19) असे मृत गोविंदाचे नाव असून अजिंक्य विक्रम मोरे हा दुसरा गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहे. खालापूर तालुक्यात चौक येथे नवीन वासहतीत काम सुरू असलेल्या मंदिराच्या पटांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती.

मंदिरातील नवीन सुरू असलेल्या सिमेंट विटांच्या खांबाला दहीहंडीची दोरी बांधली होती. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना शुभम मुकादम व अजिंक्य मोरे हे खांबालानजीक उभे होते. दहीहंडी फोडून झाल्यानंतर कमकुवत झालेला खांब कोसळून दोघांच्या अंगावर कोसळला. खांब कोसळल्यानंतर उपस्थितांनी दोघांनाही साई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांनाही एमजीएम रुग्णालयात त्वरित हलवण्यास सांगितले. एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांनाही डॉक्टरांनी तपासले. त्यात डॉक्टरांनी शुभमला मृत असल्याचे सांगितले. तर अजिंक्यवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:दहीहंडी बांधलेला खांब कोसळून एक मयत तर एक जण गंभीर जखमी

जिल्ह्यात 3 गोविंदाचा मृत्यू तर 9 जण जखमी

रायगड : दहीहंडी फोडल्यानंतर दहीहंडी बांधलेला सिमेंट विटांचा खांब कोसळून एका गोविंदाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील चौक नवीन वसाहत येथील घडली. शुभम दत्तात्रय मुकादम (19) असे मृत गोविंदाचे नाव असून अजिंक्य विक्रम मोरे हा गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहे. रायगडात दिवसभरात 3 गोविंदांचा मृत्यू झाला आहे.Body:खालापूर तालुक्यात चौक येथे नवीन वासहतीत काम सुरू असलेल्या मंदिराच्या पटांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती. मंदिराच्या नवीन सुरू असलेल्या सिमेंट विटांच्या खांबाला दहीहंडीची दोरी बांधली होती. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना शुभम मुकादम व अजिंक्य मोरे हे खांबालानजीक उभे होते. दहीहंडी फोडून झाल्यानंतर कमकुवत झालेला खांब कोसळून दोघांच्या अंगावर कोसळला.Conclusion:खांब कोसळल्यानंतर उपस्थितांनी दोघांही गोविदाना चौक मधील साई रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांनाही एमजीएम रुग्णालयात त्वरित नेण्यास सांगितले. एमजीएम रुग्णालयात नेल्यानंतर दोघांनाही डॉक्टरांनी तपासले असता शुभम हा मयत झाल्याचे त्यांनी सांगितले. तर अजिंक्य यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहीहंडी उत्सवात आज म्हसळा, तळा व खलापूर असे एकूण तीन गोविंदा मयत झाले असून नऊ जण जखमी झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.