नवी मुंबई - शहरात गेल्या दोन दिवसात २४३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. पैकी आज ११५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आज ४१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.
नवी मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोना रूग्णांसाठी रुग्णालये कमी पडत असल्याने वाशीमधील सिडको एक्जीबिशन सेंटरमध्ये ११०० खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे.
आतापर्यंत २८९७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी ११ हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आजअखेर नवी मुंबईत १३,३४० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १०,०३९ जण निगेटीव्ह आले असून,४१५ तपासणी अहवाल प्रलंबीत आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २,८८६ इतकी आहे. आज ११५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये तुर्भे येथील २८, बेलापूर येथील ५, कोपरखैरणे येथील १७, नेरुळ येथील १५, वाशीतील १७, घणसोलीतील ९, ऐरोलीत २१, दिघा येथील तिघांचा समावेश आहे. यामध्ये ४७ स्त्रिया व ६८ पुरुषांचा समावेश आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या २,८८६ इतकी झाली आहे.
आतापर्यंत नवी मुंबईत १,७१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर आज बेलापूरयेथील १, नेरूळ येथील ११, तुर्भे येथील ७, कोपरखैरणे येथील ७, घणसोली येथील ७, ऐरोलीतील ७, दिघा येथील १ अशा ४१ जणांना आज घरी सोडण्यात आले. यामध्ये १५ स्त्रिया आणि २६ पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीत १,०७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.