रायगड - खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या होनाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या अपर्णा देशमुख या सरपंच आहेत. तर उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता राऊत याची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यात शेकाप राष्ट्रवादीचे राजकारण फारसे जुळवाजळवीचे नसतानाही होनाड ग्रामपंचायत त्याला अपवाद ठरली आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचे राजकारणाचा प्रभाव आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्यात तितके काही चांगले नसल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायतीत सरपंच अपर्णा देशमुख या शेकापच्या आहेत. तर सदस्यसख्येत राष्ट्रवादीचे प्राबल्य जास्त आहे. दरम्यान उमेश देशमुख यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र ललिता राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सरपंच अपर्णा देशमुख यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी ललिता राऊत यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करीत महिलांच्या समस्यांवर अधिक भर देत त्यांना भविष्यात स्वावलंबी कसे करता येईल याकडे जास्त लक्ष देण्याचे आश्वासन उपस्थिताना दिले. यावेळी माजी सरपंच निकेश देशमुख, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, उमेश देशमुख, महेश देशमुख, विशाखा देशमुख, मोनिका देशमुख,पूजा देशमुख, सागर पाटील, कांता वाघमारे, रमेश पाटील, अमोल देशमुख, चंद्रकांत राऊत, ग्रामसेविका स्नेहल घोसालकर,उल्हास देशमुख, गणेश पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते