ETV Bharat / state

रायगड : काँग्रेस-राष्ट्रवादीचा बंडखोरांना सज्जड दम, उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी दिला आहे. राजेंद्र ठाकूर, ज्ञानदेव पवार आदी उमेदवारांनी केली आहे बंडखोरी...

रायगड आघाडीतील बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आव्हान
author img

By

Published : Oct 7, 2019, 1:16 PM IST

रायगड - जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी असताना श्रीवर्धन व अलिबाग या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या दिवसात अर्ज मागे न घेतल्यास, त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रीया रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी दिली आहे.

बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी करणार, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांचा इशारा

हेही वाचा... सर्वांनाच रडवणारा कांदा महाराष्ट्रालाही रडवणार का?

माणिक जगताप यांच्या इशाऱ्यानंतर बंडखोर काँग्रेस उमेदवार आज सोमवारी अखेरच्या दिवशी तरी अर्ज मागे घेतात की नाही, हे पहावे लागेल. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर अखेरचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे तूर्तास तरी बंडखोर उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा... 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात महायुती व आघाडीचे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी असून श्रीवर्धनमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी बंडखोरी केली आहे. अलिबागमध्ये ऍड. श्रद्धा ठाकूर याना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. येथे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा... 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, या बंडखोरांना थंड करण्यासाठी काँग्रेसने अनेक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला हवे तसे यश येताना दिसत नाही. बंडखोरांच्या उमेदवारीमुळे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी केले आहे. अन्यथा बंडखोरावर हकालपट्टीची कारवाई केली जाईल असा इसाराच जगताप यांनी दिला आहे.

Intro:बंडखोर उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी करणार

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांची प्रतिक्रिया

राजेंद्र ठाकूर, ज्ञानदेव पवार यांनी केली आहे बंडखोरी

रायगड : जिल्ह्यात आघाडी असताना श्रीवर्धन व अलिबाग या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. बंडखोरी उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले नाही तर त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार असल्याचे जिल्हा काँग्रेसध्यक्ष माणिक जगताप यांनी सांगितले. त्यामुळे बंडखोर काँग्रेस उमेदवार आज अर्ज मागे घेतात की निवडणूक लढविणार हे तीन वाजल्यानंतर कळणार आहे. मात्र तूर्तास तरी बंडखोर उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार उभी आहे.Body:जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात महायुती व आघाडीचे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी असून श्रीवर्धन मध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी बंडखोरी केली आहे. अलिबागमध्ये ऍड. श्रद्धा ठाकूर याना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. राजेंद्र ठाकूर यांनीही बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Conclusion:आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून बंडखोरांना थंड करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नाला हवे तसे यश आलेले दिसत नाही. बंडखोर उमेदवारामुळे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी केले आहे. अन्यथा बंडखोरावर हकालपट्टीची कारवाई केली जाईल असे माणिक जगताप यांनी इटीव्ही भारतशी फोनवर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.