ETV Bharat / state

अलिबाग समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; लाटांचा खेळ पाहण्यास नागरिकांची गर्दी - Tourists

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला दोन दिवसांपासून झोडपले आहे. समुद्राला भरती असल्याने उसळणाऱ्या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

अलिबाग समुद्रात उसळलेल्या लाटा
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:42 PM IST

रायगड - अलिबाग समुद्रात शनिवारी साधारण चार ते साडेचार मीटरपर्यंत लाटा उसळल्या. समुद्रातील लाटांचा खेळही पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. समुद्रकिनारी जाण्यास बंदी असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांसह नागरिकांना जाण्यास सांगितले. मात्र, तरीही नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रातील या लाटांच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

अलिबाग समुद्र

दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपून काढले आहे. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद होते. शनिवारी समुद्रात साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून गर्दी केली होती.

समुद्राला भरती असल्याने व त्यातच लाटा उसळणार असल्याने दुपारी साडेबारा नंतर समुद्र खवळण्यास सुरुवात झाली. समुद्रात येणारी लाट एकमेकांवर आपटून उंच तुषार उडताना दिसत होते. समुद्र किनारी लाटा बंधाऱ्याला आपटून साडेचार ते पाच मीटर उच उडत होत्या. समुद्रात लाटांचा हा खेळ एक ते दीड तासांपर्यंत सुरू होता. त्यानंतर ओहटी सुरू झाल्यानंतर लाटांचा मारा कमी झाला.

समुद्रात उसळलेल्या लाटांचा खेळ पाहण्यासाठी स्थानिकासह लहान बच्चे कंपनीला पर्यटक घेऊन समुद्र किनारी आले होते. समुद्रातील लाटांचा हा खेळ नागरिकांनी मनमोकळेपणाने अनुभवला. यावेळी अलिबाग समुद्र किनाऱ्याबाहेर समुद्राचे पाणी आले होते.

Intro:अलिबाग समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा

लाटांचा खेळ पाहण्यास नागरिकांची गर्दी

रायगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपून काढले असताना समुद्रातील लाटांचा खेळही रंगात आला होता. अलिबाग समुद्रात आज साधारण चार ते साडेचार मीटर पर्यंत लाटा उसळल्या असून त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. समुद्र किनारी जाण्यास बंदी असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकासह नागरिकांना जाण्यास सांगितले. मात्र तरीही नागरिकांनी व पर्यटकांनी समुद्रातील या लाटांच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.Body:जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रीपासून पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद होते. तर आज समुद्रात साडेचार ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. त्यामुळे नागरिकांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून गर्दी केली होती.

समुद्राला भरती असल्याने व त्यातच लाटा उसळणार असल्याने दुपारी साडेबारा नंतर समुद्र खवळण्यास सुरुवात झाली. समुद्रात येणारी लाट एकमेकांवर आपटून उंच तुषार उडताना दिसत होते. समुद्र किनारी लाटा बंधाऱ्याला आपटून साडेचार ते पाच मीटर उच उडत होत्या. समुद्रात लाटांचा हा खेळ एक ते दीड तासांपर्यंत सुरू होता. त्यानंतर ओहटी सुरू झाल्यानंतर लाटांचा मारा कमी झाला.
Conclusion:समुद्रात उसळलेल्या लाटांचा खेळ पाहण्यासाठी स्थानिकासह पर्यटक लहान बच्चेकंपनीला घेऊन समुद्र किनारी आली होती. समुद्रातील लाटांचा हा खेळ मनमुराद नागरिकांनी अनुभवला. यावेळी अलिबाग समुद्र किनाऱ्याबाहेर समुद्राचे पाणी आले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.