ETV Bharat / state

अलिबाग नगरपरिषदेत सेवानिवृत्त शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग नगरपरिषदेत रविवारी सकाळी ८ वाजता रंजन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला हा बहुमान मिळाल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

flag hoisting
अलिबाग नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिपाई रंजन पाटील
author img

By

Published : Jan 27, 2020, 11:12 AM IST

Updated : Jan 27, 2020, 12:19 PM IST

रायगड - अलिबाग नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिपाई रंजन पाटील यांना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. पाटील नगरपरिषदेमध्ये शिपाई कामासोबतच गेल्या २५ वर्षांपासून ध्वज चढविणे आणि उतरवण्याचे काम अविरतपणे करीत होते. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ध्वजारोहणाचा बहुमान देऊन पाटील यांना सन्मानित केले.

सेवानिवृत्त शिपाई रंजन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अलिबाग नगरपरिषदेत रविवारी सकाळी ८ वाजता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला हा बहुमान मिळाल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी महेश चौधरी, नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार

Intro:
अलिबाग नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी रजन पाटील यांना मिळाला ध्वजवंदन करण्याचा मान

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिला कर्मचाऱ्याला बहुमान

रायगड : अलिबाग नगरपरिषदेचे सेवानिवृत्त झालेले शिपाई रंजन पाटील यांना प्रजसत्ताक दिनी ध्वजरोहण सोहळ्यात झेंडा फडकविण्याचा मान मिळाला. रजन पाटील अलिबाग नगरपरिषदमध्ये शिपाई कामासोबत ध्वज फडकविण्याचा आणि उतरविण्याचे काम ते 25 वर्ष अविरतपणे करीत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकविण्याचा बहुमान देऊन त्यांना सन्मानित केले. आज प्रजसत्ताक दिनी रजन पाटील यांनी नगरपालिकेत ध्वजरोहण सोहळ्यात आपल्या हाताने झेंडा फडकविला.

Body:राष्ट्राचा ध्वज फडकविण्याचा मान हा सर्वसामान्य नागरिक किंवा शासकीय कर्मचारी याना नेहमीच मिळत नाही. याला अपवाद ठरले आहेत ते अलिबाग नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिपाई रजन पाटील. रजन पाटील हे अलिबाग नगरपरिषदेत शिपाई पदावर काम करीत होते. यावेळी नगरपालिकेत रोज झेंडा फडकविण्याचा आणि उतरविण्याचे काम 25 वर्ष इमाने इतबारे करीत होते. रजन पाटील हे आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या या सेवेसाठी प्रजसत्ताक दिनी ध्वजरोहण सोहळ्यात झेंडा फडकविण्याचा बहुमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिला आहे.

Conclusion:अलिबाग नगरपरिषदेत सकाळी आठ वाजता रजन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी महेश चौधरी, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते. नगरपरिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला हा बहुमान मिळाल्याने कर्मचारी वर्गातही समाधान व्यक्त होत आहे.
Last Updated : Jan 27, 2020, 12:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.