ETV Bharat / state

रायगडातील करंबेळी येथे डेंग्यू सदृश्य तापाची साथ; 19 संशयित रुग्ण - सभापती

गेल्या दोन दिवसांपासून करंबेळी परिसरात डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ जणांना तर खोपोली येथील नगरपालिका रुग्णालयात ८ जणांना दाखल करण्यात आले आहे.

रूग्णालयात उपचार करताना डॉक्टर
author img

By

Published : Jul 1, 2019, 10:32 PM IST

रायगड - जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करंबेळी येथे डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरली आहे. आत्तापर्यंत 19 संशयित रुग्णांना वावोशी आणि खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या डेंग्यू सदृश्य तापाच्या साथीमुळे ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत.

रायगडातील करंबेळी येथे डेंग्यू सदृश्य तापाची साथ ; 19 संशयित रूग्ण रूग्णालयात दाखल

गेल्या दोन दिवसांपासून करंबेळी परिसरात डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ जणांना तर खोपोली येथील नगरपालिका रुग्णालयात ८ जणांना दाखल करण्यात आले आहे. गावात अजूनही काही जणांमध्ये डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे दिसून आली आहेत.

ही बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने गावाची पाहणी केली आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल दोन ते तीन दिवसात उपलब्ध होणार आहेत. मात्र, तत्पूर्वी आरोग्य विभागाने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. ग्रामस्थांना तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आरोग्य सभापती नरेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची भेट घेऊन उपचारांचा आढावा घेतला.

Intro:

खालापूर तालुक्यातील करंबेळी येथे डेंग्यू सदृश्य तापाची साथ

19 संशयित वावोशी आणि खोपोली येथील रुग्णालात दाखल

रायगड : खालापुर तालुक्यातील करंबेळी येथे डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरली आहे. आत्तापर्यंत 19 संशयित रुग्णांना वावोशी आणि खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या डेंग्यू सदृश्य तापाच्या साथीमुळे ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. Body:गेल्या दोन दिवसांपासून करंबेळी परीसरात डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरल्याचे दिसून आले आहे. आत्तापर्यंत वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ जणांना तर खोपोली येथील नगरपालिका रुग्णालयात ८ जणांना दाखल करण्यात आले आहे. गावात अजूनही काही जणांनमध्ये डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. Conclusion:हि बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेनी गावाची पहाणी केली आहे. संशयित रुग्णांचे रक्त नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल दोन ते तीन दिवसात उपलब्ध होणार आहेत. मात्र तत्पुर्वी आरोग्य विभागाने गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. ग्रामस्थांना तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.  दरम्यान आरोग्य सभापती नरेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची भेट घेऊन उपचारांचा आढावा घेतला. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.