ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पनवेलमधील दहीहंडी आयोजक - साई तेज प्रतिष्ठान

पनवेल शहरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवावर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या दुःखाचे सावट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपले उद्ध्वस्त संसार पुन्हा बांधण्याचे प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी पनवेलमधील मोठ्या दहीहंडी आयोजकांनी माघार घेतली आहे. तर अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी आयोजनावर होणारा खर्च कमी केला आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पनवेलमधील दहीहंडी आयोजक
author img

By

Published : Aug 24, 2019, 8:25 PM IST

रायगड - पनवेल शहरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवावर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या दुःखाचे सावट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपले उद्ध्वस्त संसार पुन्हा बांधण्याचे प्रयत्न करत आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले पनवेलमधील दहीहंडी आयोजक
या परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी पनवेलमधील मोठ्या दहीहंडी आयोजकांनी माघार घेतली आहे. तर अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी आयोजनावर होणारा खर्च कमी केला आहे. यातून वाचलेला पैसा पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडीचा हा उत्सव यावर्षी शांततेत साजरा होत आहे. कळंबोली, पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे आणि नवीन पनवेलमध्ये दरवर्षी जवळपास 25 मोठे सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळ मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडी साजरी करतात. रोख पारितोषिके ठेवून विक्रमी थर लावण्यासाठी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देतात. या वर्षी आठ ते दहा मंडळांनी दहीहंडी रद्द केल्या आहेत. तर जास्त गाजावाजा न करता अगदी साधेपणाने दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय 10 दहीहंडी आयोजकांनी घेतला आहे.
तक्का येथील साई तेज प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेली दहीहंडी ही पनवेलचे आकर्षण असते. या दहीहंडीला शेकडो गोविंदा पथक येऊन सलामी देतात. यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या बक्षिसांची अक्षरशः उधळण केली जाते. यावर्षी मात्र आयोजनावर खर्च कमी करून अगदी साधेपणाने दहीहंडी साजरा करण्याचा निर्णय साईतेज प्रतिष्ठानने घेतला आहे, अशी माहिती आयोजक तेजस यांनी दिली. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा उत्साह गोविंदांमध्ये असणारच त्याचसोबत पूरग्रस्तांना मदत करण्याचे सामाजिक भानही गोविंदा जपणार आहेत.

Intro:बातमीला सोबत एडिट केलेला पॅकेज जोडला आहे.

पनवेल

पनवेल शहरात मोठा उत्सव मानला जाणारा 'दहीहंडी' सण...मात्र या उत्सवावर
पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या दुःखानं पाणी फेरलंय...पश्चिम महाराष्ट्रातील लोक आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करतायेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होतायेत...मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढतायेत.... या परिस्थितीत त्यांना साथ देण्यासाठी पनवेलमधील बड्या बड्या दहीहंडी आयोजकांनी माघार घेतलीये...तर अनेक आयोजकांनी पूरग्रस्तांबाबत असलेली कर्तव्यभावना जपण्यासाठी आयोजनावर होणारा खर्च कमी करून ते मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. त्यामुळे आजचा दहीहंडीचा ढाक्कूमक्ककुम चा हा उत्सव यंदा सनसनाटीत साजरा होतोय.Body:कळंबोली, पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे आणि नवीन पनवेलमध्ये दरवर्षी जवळपास 25 मोठे सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळ मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडी साजरी करतात. दहीहंडी उत्सवात उंचच उंच व्यासपीठ उभारून तेथे कलाकारांना बोलावतात. रोख पारितोषिके ठेवून विक्रमी थर लावण्यासाठी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देतात. या वर्षी त्यातल्या आठ ते दहा बड्या मंडळांनी दहीहंडी रद्द केल्या आहेत. तर जास्त गाजावाजा न करता अगदी साधेपणाने दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेत एकूण 10 बड्या दहीहंडी आयोजकांनी लाखोंची बक्षिसं ही पूरग्रस्तांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

यांनी घेतला आहे. या वेळी पारंपरिक पद्धतीने पूजन होईल आणि त्यानंतर दोन हंडय़ा फोडल्या जातील. दरवर्षी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च या उत्सवावर होतो. तो टाळून अडखूर या पूरग्रस्त गावातील नागरिकांना निवारा उभा करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

तक्का इथल्या साई तेज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली दहीहंडी ही पनवेलचे आकर्षण ठरली आहे. ग्लॅमरसच्या साथीने रंगत असलेल्या दैदिप्यमान अशा या दहिहंडीला शेकडो गोविंदा पथक येवून सलामी देतात. यासाठी पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेची बक्षिसांची अक्षरशः उधळण केली जाते. मोठ मोठ्या सेलिब्रिटींच्या चिअर अप ग्लॅमरचं वातावरण काही निराळच...पण अनेक महिन्यांची मेहनत वाया गेल्यामुळे गोविंदांची मने दुखावली गेली आहेत. त्यांची मन आणि उत्सवाची परंपरा राखता यावी यासाठी आयोजनावर खर्च कमी करून अगदी साधेपणान दहीहंडी साजरा करण्याचा निर्णय साईतेज प्रतिष्ठानचे आयोजक तेजस कांडपिळे यांनी घेतलाय. Conclusion:त्यामुळे दहीहंडी फोडण्याचा उत्साह गोविंदांमध्ये असणार त्याचसोबत पूरग्रस्तांना मदत करण्याचं सामाजिक भानही गोविंदा जपणार आहेत. म्हणूनच कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेच्या शेवटच्या चार ओळी येथे आवर्जून आठवतात.

खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला
पैसै नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही 'कणा'
पाठीवरती हात ठेऊनी, फक्त लढ म्हणा....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.