ETV Bharat / state

दिव्यांग आले पूरग्रस्त दिव्यांगांच्या मदतीला धावून - Aid for flood victims

पोलादपूर, महाड तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये इतर नागरिकांसमवेत दिव्यांग बांधवांच्या कुटुंबियांची देखील मोठी वाताहत झाली. पूरग्रस्त नागरिकांना विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी ज्याचा-त्याच्या परीने मदत देखील केली. ही मदत पूरग्रस्त नागरिकांना मिळाली मात्र दिव्यांग बांधवांपर्यंत ती अद्यापही पोहोचलेली दिसत नाही.

handicap  organization rushed to the aid of the flood-hit handicap
दिव्यांग धावून आले पूरग्रस्त दिव्यांगाच्या मदतीला
author img

By

Published : Aug 9, 2021, 10:43 AM IST

रायगड - जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे येथील दिव्यांग बांधव देखील मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या बाधित दिव्यांगाच्या मदतीला धावून दिव्यांग संघटना आली आहे. दिव्यांग संघटनेने पूरग्रस्त बांधवानी केलेली मदत पाहून उपस्थित नागरिकांनी संघटनेचे कौतुक केले आहे. तर शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा पूरग्रस्त दिव्यांगांनी यावेळी व्यक्त केली आहे.

पूरग्रस्त दिव्यांगांना मदत

दिव्यांगांपर्यंत मदत पोहोचलीच नाही -

पोलादपूर, महाड तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये इतर नागरिकांसमवेत दिव्यांग बांधवांच्या कुटुंबियांची देखील वाताहत झाली होती. पूरग्रस्त नागरिकांना विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी ज्याचा त्यांच्यापरीने मदत देखील केली. ही मदत पूरग्रस्त नागरिकांना मिळाली मात्र दिव्यांग बांधवापर्यंत ती पोहचली अद्यापही पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे त्याचे आणि कुटुंबियांचे जगणे असह्य होत होते. याची माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना तथा रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष साईनाथ पवार यांना याची माहिती भेटली. साईनाथ पवार यांनी महाड पोलादपूर येथील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांची होणारी हाल याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके, आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार, अपंग संघर्ष समितीचे शैलेश सोनकर यांच्या कानावर टाकली. त्यानंतर राजू साळुंके, सागर पवार यांनी अत्यावश्यक साहित्याची मदत दिली. तर दिव्यांग बांधवांसाठी गुरुप्रीत सिंग या उद्योजकांनी ब्लॅंकेट, सतरंजी मदत दिली. ही मदत फक्त रायगड जिल्ह्यातीलच दिव्यांग नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण येथील दिव्यांगांनासुद्धा मदत केली आहे.

संघटना दिव्यांगांच्या मदतीसाठी तत्पर असणार -

नैसर्गिक आपत्ती अथवा एखादे मोठे संकट ओढावते त्या वेळेस दिव्यांग नेहमीच सुविधांपासून वंचित राहतात. यासाठी दिव्यांगांना दिव्यांगांनीच मदतीचा हात पुढे केला पाहिजे या संकल्पनेतून ही मदत करण्यात आली आहे. तर कोणत्याही प्रसंगात संघटना दिव्यांगांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचा विश्वास देखील यावेळी साईनाथ पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - कोरोना अजून गेला नाही, तिसरी लाट येण्याची शक्यता; नागरिकांनी संयम पाळावा - ठाकरे

हेही वाचा - मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.