ETV Bharat / state

पनवेलमध्ये नगरसेवकांच्या मुलांची 'दबंग'गिरी, तक्रार केल्याने एकाला मारहाण - Raigad news

पनवेलमधील गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुले आणी एक भाचा अशा चौघांनी हा जीवघेणा हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या मुलांनी तक्रारदार सिद्धार्थ गायकवाड यांना मारहाण केली होती.

पनवेलमध्ये नगरसेवकांच्या मुलांची 'दबंग'गिरी, तक्रार केल्याने एकाला मारहाण
author img

By

Published : Aug 6, 2019, 6:29 PM IST

रायगड (पनवेल) - 'आम्ही नगरसेवकांची मुले आहोत, आमच्या विरूद्ध पोलीस तक्रार करायची हिंमतच कशी झाली,' अशी गुंडगिरीची भाषा करत पनवेलमध्ये नगरसेवकाच्या मुलांची दबंगगिरी पाहायला मिळाली. आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून नगरसेवकाच्या मुलांनी चक्क तक्रारदार तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या.

पनवेलमध्ये नगरसेवकांच्या मुलांची 'दबंग'गिरी, तक्रार केल्याने एकाला मारहाण

पनवेलमधील गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुले आणी एक भाचा अशा चौघांनी हा जीवघेणा हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या मुलांनी तक्रारदार सिद्धार्थ गायकवाड यांना मारहाण केली होती. मारहाण झालेल्या सिद्धार्थ गायकवाड यांनी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मारामारीची तक्रार केल्याचा राग डोक्यात ठेवून आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करू शकतो? अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले सिध्दार्थला शोधत होती. मात्र, तो हाती न लागल्यामुळे त्याचा राग त्यांनी तक्रारदाराचा भाऊ विश्वनाथ गायकवाड यांच्यावर काढला. नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या मुलांनी रोडपली येथील गिरीराज बार अँड रेस्टॉरंट समोर तक्रारदाराच्या भावाला मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या.

या हल्ल्यात जबर जखमी झालेले विश्वनाथवर यांच्यावर पनवेलच्या स्पर्श रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दखल झाला आहे. नगरसेवक जगदिश गायकवाड यांची मुले फरार आहेत. कळंबोली पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हे प्रकरण नगरसेवकाच्या मुलाचे आहे. यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो, की आरोपींना अटक होते. हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Intro:सोबत फोटो आणि बाईट जोडली आहे
पनवेल

आम्ही नगरसेवकाचे मुलं आहोत, आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायची हिंमतच कशी झाली, अशी गुंडगिरीची भाषा करत पनवेलमध्ये एका नगरसेवकांच्या मुलांची दबंगगिरी पहायला मिळाली. आपल्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली म्हणून नगरसेवकाच्या मुलांनी चक्क तक्रारदार तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केलाय. Body:पनवेलमधील गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर रात्री साडेअकरा वाजता हि घटना घडली. पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची ही तीन मुले आणि एक भाचा अशा चौघांनी हा जीवघेणा हलला केलाय. दोन दिवसांपूर्वी नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या मुलांनी तक्रारदार सिद्धार्थ गायकवाड याला मारहाण केली होती. मारहाण झालेल्या सिद्धार्थ गायकवाड याने त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मारामारीची तक्रार केल्याचा राग डोक्यात ठेवून आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करू शकतो? अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले सिध्दार्थला शोधत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे त्याचा राग त्यांनी तक्रारदाराचा भाऊ विश्वनाथ गायकवाड याच्यावर काढला. नगरसेवक जगदिश गायकवाड यांच्या मुलांनी रोडपली येथील गिरीराज बार अँड रेस्टॉरंट समोर तक्रारदाराच्या भावालाच बेदरकारपणे मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या.
Conclusion:या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या विश्वनाथवर पनवेल मधील स्पर्श रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या बाबतीत कळंबोली पोलीस स्टेशनला गुन्हा दखल झाला असून नगरसेवक जगदिश गायकवाड यांची मुले फरार झाली आहेत. कळंबोली पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून आता हे प्रकरण नगरसेवकाच्या मुलाचं आहे म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो की आरोपींना अटक होते, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

बाईट: सिद्धार्थ गायकवाड, जखमीचा भाऊ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.