ETV Bharat / state

गावठी पिऊन विषबाधा झाल्यापेक्षा दारूची दुकाने सुरू करा, भाजपच्या पदाधिकाऱ्याची मागणी - संचारबंदी

गावठी दारू पिऊन विषबाधा होण्यापेक्षा सरकारने अबकारी कर वाढविण्यासाठी दारुची दुकाने सूरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी केली.

Corona
पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील
author img

By

Published : Apr 23, 2020, 6:10 PM IST

नवी मुंबई - संचारबंदीत पनवेल शहरातील गावठी दारूचे दोन अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत. सुमारे पंधराशे लीटर दारू पोलिसांनी नष्ट केली असून पाच जणांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. गावठी दारू पिऊन विषबाधा होण्यापेक्षा सरकारने अबकारी कर वाढविण्यासाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी केली आहे.

पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील

बुधवारी पनवेलचे उपविभागिय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाटील यांनी याबाबतत मागणी केली आहे. पोलिसांची दारूच्या गैरधंद्यावर संचारबंदीत विशेष लक्ष आहे. मात्र सहज दारु मिळत नसल्याने मद्यपी गावठी सारख्या अवैध दारूचा पर्याय निवडत असल्याकडे माजी सदस्य पाटील यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.