ETV Bharat / state

अदिती तटकरे, विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज वैध

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राची रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होळी केली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अदिती तटकरे यांच्यासोबत इतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना रोहा येथील गुन्ह्याचा उल्लेख अर्जात केला नव्हता.

author img

By

Published : Oct 5, 2019, 9:01 PM IST

रायगड - श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावर अकमल कादरी यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे अदिती तटकरे यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. अकमल कादरी हे याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे कादरी यांनी सांगितले आहे. अदिती तटकरे यांच्यावर घेतलेल्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे निकाल देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेपही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला.

अदिती तटकरे, विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज वैध

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राची रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होळी केली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अदिती तटकरे यांच्यासोबत इतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना रोहा येथील गुन्ह्याचा उल्लेख अर्जात केला नव्हता.

अर्ज छाननी दरम्यान अदिती तटकरे यांच्या अर्जावर इंडियन युनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी गुन्हा लपविल्याबाबत आक्षेप घेतला होता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी अकमल कादरी यांनी घेतलेला आक्षेप फेटाळला असून याबाबत तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असा निर्णय दिला. त्यामुळे अदिती तटकरे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.

अकमल कादरी यांनी निर्णयानंतर झालेल्या सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली असून याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे कादरी यांनी सांगितले. अदिती तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली होती.

विनोद घोसाळकर यांच्या अर्जावर राष्ट्रवादीने घेतली होती हरकत -
महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. विनोद घोसाळकर हे म्हाडाचे अध्यक्ष असून शासनाचे मानधन घेतात ही माहिती लपवली असल्याचा आक्षेप त्याच्यावर घेतला होता. मात्र, घोसाळकर हे एक रुपयाही मानधन घेत नसल्याचे म्हाडा अधिकारी यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी फेटाळला.

Intro:अदिती तटकरे, विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज वैध

न्यायालयात दाद मागणार - अकमल कादरी

विनोद घोसाळकर यांच्या अर्जावरही राष्ट्रवादीने घेतला होता आक्षेप

रायगड : श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावर अकमल कादरी यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे अदिती तटकरे यांचा निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. अकमल कादरी हे याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे कादरी यांनी सांगितले आहे. अदिती तटकरे यांच्यावर घेतलेल्या आक्षेप नंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे निकाल देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला.

दैनिक सामना या वृत्तपत्राची रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कडून होळी केली होती. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात अदिती तटकरे यांच्यासोबत इतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना रोहा येथील गुन्ह्याचा उल्लेख अर्जात केला नव्हता. Body:अर्ज छाननी दरम्यान अदिती तटकरे यांच्या अर्जावर इंडियन युनियन मुस्लिम लीगचे उमेदवार अकमल कादरी यांनी गुन्हा लपविल्याबाबत आक्षेप घेतला होता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी अकमल कादरी यांनी घेतलेला आक्षेप फेटाळला असून याबाबत तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असा निर्णय दिला. त्यामुळे अदिती तटकरे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.

अकमल कादरी यांनी निर्णयानंतर झालेल्या सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिगची मागणी केली असून याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे कादरी यांनी सांगितले. अदिती तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली होती.Conclusion:विनोद घोसाळकर यांच्या अर्जावर राष्ट्रवादीने घेतली होती हरकत

महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. विनोद घोसाळकर हे म्हाडाचे अध्यक्ष असून शासनाचे मानधन घेतात ही माहिती लपवली असल्याचा आक्षेप त्याच्यावर घेतला होता. मात्र घोसाळकर हे एक रुपयाही मानधन घेत नसल्याचे म्हाडा अधिकारी यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी फेटाळला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.