पुणे - शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील खंडूजी बाबा चौकात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत, फडणवीसांच्या या विधानाविरोधात शिवसेनेने आंदोलन करत त्यांच्या फोटोला जोडे मारले. फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केली.
तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याबद्दल अमृता फडणवीस यांच्या विरोधातही शिवसेनेने घोषणाबाजी केली. महिला सौभाग्याचे प्रतिक म्हणून बांगड्या घालतात. शक्तीचे प्रतिक म्हणूनही बांगड्या महिला घालतात. पण, फडणवीसांनी अशी टीका करत महिलांचा अपमान केला आहे, असे महिलांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शिवसेना मूग गिळून आहे. त्यांनी बांगड्या भरल्या आहेत का, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.