ETV Bharat / state

Lathi Charge on Warkari : पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळले वारकऱ्यांवरील लाठीचार्जचे आरोप; वारकरी वर्गात संताप - pune news

आळंदीत रविवारी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला नाही. काही स्थानिक नागरिक विना पासेस मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी पोलिसांची आणि त्यांची झटापट झाली आहे. त्यामुळे या पवित्र अशा पालखी उत्सवाला गालबोट लागू नये आणि तसा प्रयत्नही कोणी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विनय कुमार चोबे पिंपरी चिंचवड यांनी केलेले आहे. तर वारकरी वर्गातून मात्र या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

Lathi Charge on Varkari
वारकऱ्यांवर लाठीचार्ज
author img

By

Published : Jun 12, 2023, 12:17 PM IST

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला माऊलींचा पालखी उत्सव आहे. रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी झाल्याने पोलिसांची काही स्थानिक नागरिकांची झटापट झाली होती. परंतु या संदर्भात काही जणांकडून अफवा पसरल्या जात आहे. या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याच्या बातम्या येत आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासंदर्भात एक स्पष्टीकरण देऊन पत्र लिहिलेले आहे. मात्र या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांकडून या तरुण वारकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप हे वारकरी करीत आहेत. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे पोलिसांनी समजूत काढून सोडून देणे अपेक्षित असताना अशा प्रकारे वारकऱ्यांना मारणे, याबद्दल सुद्धा आता वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

चेंगराचेंगरीची स्थिती : याबाबतीत दिलेल्या निवेदनात विनयकुमार चौबे यांनी म्हटले आहे की, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते.

स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट : मात्र रविवारी अचानक काही स्थानिक युवकांनी यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे पोलीस आयुक्त चौबे यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा :

  1. Warkari Lathicharge News : वारकऱ्यांवरील लाठीमाराची घटना क्लेशदायक, पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे; लाठीमाराच्या घटनेवर विरोधकांच्या प्रतिक्रिया
  2. Lathi Charge On Varkari : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलीस आयुक्त म्हणतात फक्त किरकोळ झटापट, विरोधी पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया
  3. Riot In Funeral Procession : पोलीस ठाण्यासमोर अंत्ययात्रेत गदारोळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.