ETV Bharat / state

बारामतीत सोमवारपासून 'कृषिक 2021' कृषी तंत्रज्ञान सप्ताह, शरद पवारांसह दिग्गज लावणार हजेरी

author img

By

Published : Jan 17, 2021, 3:43 PM IST

बारामतीत सोमवारपासून कृषिक 2021 कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरूवात होणार आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना या सप्ताहात मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी या सप्ताहात घेतली जाणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय.

बारामतीत कृषी तंत्रज्ञान सप्ताह
बारामतीत कृषी तंत्रज्ञान सप्ताह

बारामती - येथील शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात 18 ते 24 जानेवारी दरम्यान 'कृषिक 2021' कृषी तंत्रज्ञान सप्ताह पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक दिग्गजांची या सप्ताहाला उपस्थिती असेल. राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय.

दिग्गज लावणार हजेरी

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपमहासंचालक सुरेश चौधरी, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार हे या सप्ताहाला भेट देणार आहेत.

यंदाची वैशिष्ट्ये

यंदाच्या कृषिक 2021 चे वैशिष्ट्य म्हणजे शेतकर्‍यांना कृषी विज्ञान केंद्रासह जैविक तण व्यवस्थापन संस्थेच्या संशोधनात्मक प्रयोगांची माहिती बघता येईल. संस्थेकडून सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावरील केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांची माहिती या सप्ताहात शेतकऱ्यांना घेता येईल असं ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितलं.

टेस्ट लेवल टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून निवड

या कृषी सप्ताहात शेतकऱ्यांना देश-विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पहायला मिळणार असून या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. तसेच राज्यातील असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्यासाठी विकेल ते पिकेल, एक जिल्हा एक उत्पादन, ही संकल्पना राबविण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राची राज्य व केंद्र सरकार मार्फत टेस्ट लेवल टेक्निकल इन्स्टिट्यूट टेस्ट म्हणून निवड झाली आहे. या अनुषंगाने फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग, ब्रँडिंग या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. तसेच मिलेट वर्ल्ड मधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांसह लाईव्ह डेमोचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी घेणार खबरदारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन सप्ताहात केले जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवून शेतकऱ्यांचे शारीरिक तापमान मोजून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा - औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, शिवसेनेचा काँग्रेसला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.