पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. येथील चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली आहे. यासोबतच 8 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदी, जमावबंदीचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या सर्व परिस्थितीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.
![pimpri chinchwad police commissionerate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-03-av-police-corona-mh10024_22062020233248_2206f_1592848968_601.jpg)
हेही वाचा - देशात सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात, आतापर्यंत 7 लाखहून अधिक नमुन्यांची तपासणी
सध्या, राज्यात काही शहरांसह पिंपरी-चिंचवड शहरही रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. यामुळे शहरातील अनेक बाजापेठा सुरू झाल्या. नागरिकांनी अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. यावळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.