पुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचा मुक्काम पूर्ण झाला आहे. आज पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. काल शहरात वाहतुकीत काही ठिकाणी बदल करण्यात आले होते. आज आणि उद्या 15 जून या कालावधीत पोलिसांकडून काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सोलापूरकडून पुणे, नगर, नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे सूचना दिल्या आहेत. सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर पर्यायी मार्ग म्हणून चौफुला, केडगाव, पारगाव, नव्हरे फाटा, नगर रोड शिक्रापूर ,चाकण ,तळेगाव ,चेंबूर फाटा, केसनंद, वाघोली, नगर रोड मार्ग निश्चित स्थळी जाण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गावरील वाहतूक वळण्यात आली : लोणीकंदकडून थेऊर फाट्याकडे येणाऱ्या वाहनांना सुद्धा पर्यायी मार्ग म्हणून लोणीकंद शिक्रापूर नव्हेरे या मार्गाचा वापर करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नगर रोडवरील खराडी बायपास येथून मगरपट्टा रोडने सोलापूर रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणजे खराडी बायपास नगर रोडने शिक्रापूर मार्गे नाव्हरे किंवा शिरूर मार्गे ही वाहतूक वळविण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिवे घाटातून सासवडला जाणार आहे. आज मध्यरात्री दोन वाजल्यापासून 16 जून पर्यंत पुण्याहून सासवडकडे दिवेघाट आणि वबोपदेव घाट मार्गातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहन चालकाने खडीमशीन चौकातून कात्रज कापूरहोळ मार्गाचा वापर करावा.
वाहतुकीची माहिती येथे मिळेल : सासवड होऊन येणारी सर्व वाहतूक गराडे, खेड, शिवापुर मार्ग पुण्याकडे वळवण्यात आली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनाने भैरोबा नाला चौक, लुल्ला नगर चौक, कोंढवा, खडीमशीन चौक, बोपदेव घाट मार्गे सासवडकडे जावे. मंतरवाडी फाटा फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडीमशीन चौक मार्गे बोगदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलाविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखेकडून मुख्य नियंत्रण कक्षाचा नंबर देण्यात आलेला आहे.020266850000,0202668400 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा -