ETV Bharat / state

ठाकरेंची शिवसेना कुठं आहे?, सहा-सातजणांमधील चारजण माझ्या संपर्कात -राणे - Thackeray group is over and four

राज्यात मुंबई महापालिकेत सत्ता येण्यासाठी शिंदे सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच, ठाकरे गटाकडून देखील शिंदे सरकारवर टिका केली जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गट कुठ राहिला आहे. तो तर संपला आहे. आता शिवसेना कुठ राहिली आहे. 56 वरून आत्ता 6 ते 7 च जण राहिले आहेत. त्यामधीलही चारजण माझ्या संपर्कात आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यामांंशी बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 22, 2022, 3:21 PM IST

Updated : Oct 22, 2022, 4:01 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 'रोजगार मेळा' या योजनेचा शुभारंभ झाला असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात हा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि गोवा येथे झाला आहे. पुण्यातील यशदा सभागृह येथे रोजगार मेला या कार्यक्रमाचे आज शनिवार (दि. 22 ऑक्टोबर)रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित होते. यावेळी राणे यांना उद्धव ठाकरे यांच्या बद्दल विचारल असता ते म्हणाले की ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. त्यांचे राजकारण हे मातोश्रीपुरतेच आहे असही ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध व्हाव्यात म्हणून गेली 8 वर्ष प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नातून १० लाख तरुण तरुणींना नोकऱ्या द्यायच्या आहेत. त्याचा पहिला टप्पा आज आहे. शासनाच्या विविध विभागात आज नोकऱ्या दिल्या आहेत. भारतात आज सर्वत्र ७५ हजार 226 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. आज ज्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे देखील यावेळी राणे म्हणाले आहेत.

राज्यात सध्या दिवाळीच्या शिधा वाटपावरून राजकारण केले जात आहे. यावर राणे यांना विचारले असता ते म्हणाले, की मला अस वाटत आहे की चांगल ते पाहावे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुणांच्या जीवनात एक आनंद मिळवून दिला आहे. ज्यांना आज नोकऱ्या मिळाल्या आहे. त्यांना आनंद आहे. त्यांच्या घरात आनंद आहे. राज्यात जर कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निमित मी काही बोलणार नाही. असे देखील यावेळी राणे म्हणाले.

राज्य सरकारकडून जी शिधा वाटप केली जातं आहे.त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले आहे. यावरून विरोधक टीका करत आहेत. यावर राणे यांना विचारले असता ते म्हणाले की फोटो दिले तर काय बिघडले. फोटोवर दुसर कागद टाका आणि फोडा म्हणावे. तुम्हाला जर फोटोला विरोध असेल तर तुमचे फोटो लावा आणि तुम्ही तुमचे वाटा एवढी संकुचित वृत्ती ठेवू नये, असा टोला देखील राणे यांनी लगावला आहे. तसेच, शिधा बाबत राजकारण केले जातं आहे. हातात काहीही राहील नाही म्हणून घर बसल्या टीका केली जात आहे असही ते म्हणाले आहेत.

काल शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या दिवाळी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र होते. राज्यात या तिन्ही पक्षांचा युती होईल की काय याबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, की मीडियाने जसे पाहिले तसे तुम्ही घ्या. तसेच, यावेळी सामन्याच्या अग्रलेखाबाबत विचारले असता ते म्हणाले, की मी सामना वाचत नाही आणि पाहतही नाही. अग्रलेखात वाचण्यासारखे काहीही नसते असही ते म्हणाले आहेत.

भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्ग येथे जाऊन राणे यांची मिमिक्री केली यावर राणे यांना विचारला असता ते म्हणाले, की ती मिमिक्री नव्हे तर याला टिंगल म्हणतात. कोणाची टिंगल करणे हे चांगल गुण नाही. तसेच यावेळी राज्यातील राजकारणातील स्थर घसरत चालला आहे. माणसाची वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, त्यामुळे स्तर घसरू नये असे मला वाटते असही ते म्हणाले आहेत.

Last Updated : Oct 22, 2022, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.