ETV Bharat / state

श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज राहायचे भाड्याच्या घरात, म्हणाले इतिहासाशी छेडछाड नको - श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज भाड्याच्या घरात

पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यात नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. पानिपतनंतर सहा महिन्यातच नानासाहेब पेशवेंचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली. त्यांनी महादजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले.

panipat
पानिपत
author img

By

Published : Dec 9, 2019, 3:36 PM IST

Updated : Dec 9, 2019, 5:15 PM IST

पुणे - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटातून मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर मांडला आहे. गेल्या काही काळात बाजीराव मस्तानी, पानिपत अशा चित्रपटातून पेशवा या मराठेशाहीच्या योध्याचा दुर्लक्षित पराक्रम जगा समोर आला. एकेकाळी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केलेल्या या पेशव्याचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वंशजांना पेशव्यांची राजधानी असलेल्या पुणे शहरात प्रवेश नव्हता. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. बऱ्याच काळाने पुन्हा पुण्यात येणाऱ्या पेशव्यांना पुर्वजांचे एवढे साम्राज्य असूनही भाड्याच्या घरात राहायची वेळ आली होती.

श्रीमंत पेशव्यांच्या दहाव्या वंशजांना राहावे लागले होते भाड्याच्या घरात

पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यात नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. पानिपतनंतर सहा महिन्यातच नानासाहेब पेशवेंचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली. त्यांनी महादजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले. मात्र, नंतर हळूहळू पेशवाईची रया गेली. देशात ब्रिटिशांचा अंमल वाढला असताना दुसऱ्या बाजीरावने ब्रिटिशांशी तह केला. पुढे ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांना ब्रह्मव्रतला पाठवले पुढे त्यांना कैदही केले. तर अमृतराव पेशवे यांना पुणे सोडून वाराणसीला पाठवून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

पेशव्यांना ब्रिटिशांनी पुण्यात येऊ दिले नाही. पेशवे पुन्हा पुण्यात आले तर लोक त्यांच्यासोबत येतील आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान करतील अशी भीती ब्रिटीशांना होती. त्यामुळे नंतरच्या पेशव्यांना पुण्यात येऊ दिले गेले नाही. अखेर 1930 ला पेशव्यांची आठवी पिढी पुण्यात येऊ शकली. मात्र, एकेकाळी पुण्यातल्या भव्य शनिवार वाड्यात राहणाऱ्या आणि देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या या वंशजांना पुण्यात आल्यावर राहायला घरही नव्हते. पेशव्यांच्या या वंशजांनी पुण्यात भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली होती.

नंतरच्या काळात नोकरी पेशा स्वीकारत त्यांनी स्वतःची वास्तू उभी केली. पेशव्यांची नववी आणि दहावी पिढी सध्या पुण्यात राहते. पुण्यातल्या डेक्कन परिसरात ते राहायला आहेत. एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानंतरचा इतिहास आपण विसरून गेलो. महाराजांच्यानंतर मराठ्यांनी जो पराक्रम केला तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही. आता बाजीराव मस्तानी असेल किंवा नुकताच आलेला पानिपत चित्रपट असेल या चित्रपटांच्या माध्यमातून हा इतिहास समोर येतो आहे. याचा आनंद आणि अभिमान आहे. मात्र, मनोरंजनाच्या नावाखाली अशा चित्रपटांमध्ये राजघराण्यातील महिलांना नाचताना दाखवणे क्लेशदायक आहे. असे व्हायला नको, इतिहासाचे योग्य चित्रण झाले पाहिजे खरा इतिहास समोर आला पाहिजे अशी अपेक्षा पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली.

Intro:सिनेमाच्या माध्यमातून पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जात असताना पेशव्यांच्या वंशजांवर एक स्पेशल रिपोर्टBody:mh_pun_02_peshwa_dinesty_today_special_story_7201348

anchor
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटातून मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास हिंदुस्थान च्या जनतेसमोर मांडला आहे...गेल्या काही काळात बाजीराव मस्तानी, पानिपत अशा चित्रपटातून पेशवा या मराठेशाहीच्या योध्याचा दुर्लक्षित पराक्रम जगा समोर भव्य स्वरूपात येतो आहे...एकेकाळी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केलेल्या या पेशव्याचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वंशजांना पेशव्यांच्या राजधानी पुणे शहरात प्रवेश नव्हता, त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती आणि बऱ्याच काळाने पुन्हा पुण्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या वंशजांना ज्या पुण्यात त्यांच्या पूर्वजांचे साम्राज्य होते त्या पुण्यात चक्क भाड्याच्या घरात राहायची वेळ आली होती.....पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला या धक्क्यात नानासाहेब पेशवे यांचं निधन झाले पानिपत नंतर सहा महिन्यातच नानासाहेब पेशवे वारले त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली त्यांनी महादजी शिंदे , नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले मात्र नंतर हळूहळू पेशवाईची रया गेली...देशात ब्रिटिशांचा अंमल वाढला असताना दुसरा बाजीराव ने ब्रिटिशांशी तह केला पुढे ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांना ब्रह्मव्रत ला पाठवले पुढे त्यांना कैद ही केले... तर अमृतराव पेशवे यांना पुणे सोडून वाराणसीला पाठवले पेशव्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली नंतरच्या पेशव्यांना ब्रिटिशांनी पुण्यात येऊ दिले नाही पेशवे पुन्हा पुण्यात आले तर लोक त्यांच्या सोबत येतील आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान करतील अशी भीती ब्रिटीशांना होती त्यामुळे नंतरच्या पेशव्यांना पुण्यात येऊ दिले गेले नाही अखेर 1930 ला पेशव्यांची आठवी पिढी पुण्यात येऊ शकली मात्र एकेकाळी पुण्यातल्या भव्य शनिवार वाड्यात राहणाऱ्या आणि देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या या वंशजांना पुण्यात आल्यावर राहायला घरही नव्हते पेशव्यांच्या या वंशजांनी पुण्यात भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली नंतरच्या काळात नोकरी पेशा स्वीकारत त्यांनी स्वतःची वास्तू उभी केली पेशव्यांची नववी आणि दहावी पिढी सध्या पुण्यात राहते पुण्यातल्या डेक्कन परिसरात ते राहायला आहेत.... एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत पेशव्यांचे हे औषध व्यक्त करतात शिवाजी महाराजांच्या नंतर चा इतिहास आपण विसरून गेलो महाराजांच्या नंतर मराठ्यांनी जो पराक्रम केला तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही आता बाजीराव मस्तानी असेल किंवा नुकताच आलेला पानिपत चित्रपट असेल या चित्रपटांच्या माध्यमातून हा इतिहास समोर येतो आहे याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आहे मात्र मनोरंजनाच्या नावाखाली अशा चित्रपटांमध्ये राजघराण्यातील महिलांना नाचताना दाखवणे क्लेशदायक आहे असं व्हायला नको इतिहासाचे योग्य चित्रण झाले पाहिजे खरा इतिहास समोर आला पाहिजे अशी अपेक्षा देखील ते व्यक्त करतात.....
Byte उदयसिह पेशवा, पेशव्यांचे वंशज
Byte जय मंगलाराजे पेशवा, उदयसिंह यांच्या पत्नी
Conclusion:
Last Updated : Dec 9, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.