ETV Bharat / state

स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून सुरू होणार - महापौर मोहोळ - Swargate to Katraj BRT News

स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. या कामातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसात पूर्ण करणार आहोत. त्यामुळे, हा मार्ग येत्या एक जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Mayor Muralidhar Mohol
महापौर मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:35 PM IST

पुणे - स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. या कामातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसात पूर्ण करणार आहोत. त्यामुळे, हा मार्ग येत्या एक जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ

हेही वाचा - पुणे-नाशिक मार्गावरील वाहतुक कोंडीने प्रवाशांची डोकेदुखी

मोहोळ यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांबरोबर बीआरटी मार्गाची पाहाणी केली. त्यानंतर मोहोळ यांनी मार्ग सुरू करण्याची घोषणा केली. बीआरटीच्या कामाची निविदा 2000 साली काढण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने 2018 साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता आणि या रस्त्यावरील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे, यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला होता. मात्र, आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून, उरलेली कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे, हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

तांत्रिक प्रक्रियेमुळे लाबले काम - मोहोळ

तांत्रिक प्रक्रिया आणि विविध बाबींमुळे हे काम लांबले असले, तरी आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काम योग्यरित्या पूर्ण झाले असून एक जानेवारीपासून हा मार्ग खुला करण्यात येत आहे. या मार्गाचा फायदा या भागातील नागरिकांना होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे, असे मोहोळ म्हणाले.

त्वरित आरटीपीसीआर चाचणी करावी

25 नोव्हेंबर नंतर पुणे शहरात लंडन किंवा युरोपियन देशातून आलेल्या पुणेकरांना महापालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे, की आरोग्य विभागाने संपर्क नाही केल्यास, अशा सर्व लोकांनी त्वरित नजिकच्या महापालिका आरोग्य केंद्रात संपर्क करून आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. बाहेरून येणाऱ्या तीनशे लोकांची यादी महापालिका प्रशासनाकडे आली आहे. त्यातील 270 जणांचे आरटीपीसीआर करण्यात आले आहे. मात्र, काही जणांची नावे आणि पत्ता कळला नाही. या संदर्भात महापालिका प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत स्वतःहून पुढे येत आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

चार जानेवारीपासून शाळा सुरू होण्याबाबत प्रशासनाने आदेश काढले आहेत. पूर्ण शाळा सुरू करण्यात यावी, अशी तयारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अनेक विषयांवर देखील चर्चा होत आहे. शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच, पालकांकडूनही हमी पत्र घेण्यात येत आहे. जर अल्पप्रमाणात हमीपत्र आलेत, तर शाळा सुरू करायची की नाही, याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच, विविध संस्था आणि पालक संघटनांबरोबरही चर्चा करण्यात येत आहे. असे मोहोळ म्हणाले.

हेही वाचा - 'दिगंबरा, दिगंबराच्या' जयघोषात नारायणपूर येथे दत्त जयंती सोहळा संपन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.