पुणे - मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील नीरा नदीत आज (शनिवारी) संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. यावेळी माऊली-माऊलीच्या जयघोष करण्यात आला.
कोरोनाच्या महासंकटात सर्व धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. हे महासंकट नसते तर माऊलींच्या पादुकांना मोठ्या भक्तीभावात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत नीरा स्नान घातले गेले असते. मात्र, अनेक वर्षांची नीरा स्नान की परंपरा मोडू नये, याकरिता आज मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले.
नीरा आणि पडेगांव येथील काही निवडक लोकांनी माऊलींच्या स्नानाचा प्रतिकात्मक सोहळा साजरा केला. सोहळ्यातील ही परंपरा खंडित होऊ नये, म्हणून हा स्नान सोहळा साजरा करण्यात आला. विधिवत पूजा करून पांडुरंग, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. दरम्यान, माऊलींचा स्नान सोहळा पाहता आला नाही याची खंत येथील लोकांच्या मनाला लागली. दीडशे ते पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेल्या या सोहळ्यात भाग न घेता आल्याने यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा - शेतकरी दहशतीत; टोळधाडनंतर सेपरेटा अळ्यांचा हल्ला, झाडांची पाने करतात फस्त