पुणे - पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना 103 दिवसानंतर जामीन मिळाली. (sanjay raut bail). यावेळी न्यायालयाने ईडी वर ताशेरे ओढत राऊत यांची अटक बेकायदेशीर होती असे म्हटले. यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपा वर जोरदार टीका केली आहे. त्या आज बारामती मतदार संघातील बावधन येथे आल्या होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या. (Supriya Sule reaction on sanjay raut bail).
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे - सुळे म्हणाल्या, 103 दिवस संजय राऊत यांच्या घरातील, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांच्यापासून दूर होते. हे दिवस कसे गेले असतील. त्यांचे 103 दिवस कोण आणि कसे परत करणार आहे, याचे उत्तर मला हवं आहे. हाच न्याय आहे का? ते कोणाच्यातरी विरोधात बोलले म्हणून त्यांना जेल मध्ये टाकून दिलं जात. याला न्याय म्हणतात का? असा सवाल यावेळी सुळे यांनी उपस्थित केला.
भारत जोडो यात्रेला अप्रतिम रिस्पॉन्स - सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सुरु असून सुप्रिया सुळे ह्या देखील या यात्रेला उपस्थित होत्या. यावेळी त्यांना या यात्रे बाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेला अप्रतिम रिस्पॉन्स मिळत आहे. मी तिथे गेल्या वर मला कृतज्ञता ही वाटली आणि दडपण देखील वाटल. मोठ्या प्रेमाने लोकं, तरुण वर्ग हे त्या यात्रेत येत आहेत आणि गर्दी करत आहेत. लोकांचे प्रेम आणि अपेक्षा या यात्रेत दिसून आल्या. तसेच लोकांच्या अपेक्षा पाहून दडपण देखील आलं, अस त्या यावेळी म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना जबाबदारी घ्यावी लागणार - राज्यातील एक प्रकल्प पुन्हा राज्याबाहेर जात आहे. यावर सुळे म्हणाल्या की, मी माहिती घेऊन बोलत असते. मला जे बातम्यात दिसलं ते मी बोलले. माझं मुख्यमंत्री यांना एक नागरीक म्हणून म्हणणं आहे की ते सात वर्ष सत्तेत आहे. आधी भाजप बरोबर मग महाविकास आघाडी बरोबर आणि आत्ता मुख्यमंत्री म्हणून. त्यांना अकाऊंटीबीलीटी तर घ्यावी लागणार आहे.
छत्रपती विरोधी चित्रपट खपवून घेतले जाणार नाहीत - सध्या हर हर महादेव चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर सुळे म्हणाल्या, बांधल कुटूंब बाबत काय दाखवले आहे हे आपण पाहिलं आहे. सगळ्यांना माहीत आहे की हे कुटुंब इतिहासाचे साक्षीदार आहेत. ते छत्रपती एकनिष्ठ होते. विश्वासू होते. सत्य आहे ते दाखवले पाहिजे. यात राजकारण नाही करायचा. गलत है वो गलत है. छत्रपती विरोधी चित्रपट खपवून घेतले जाणार नाहीत. अस देखील यावेळी सुळे म्हणाल्या. पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की महापालिकेने सुरू केलेले 24 तास पाणीपुरवठा योजना पूर्णतः फेल आहे. वाहतूक समस्या आहे तशीच आहे त्यामुळे महापालिका काय काम करते पाहवं लागेल, असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या.