ETV Bharat / state

Pune Police Suicide : पुण्यातील महिला पोलीस निरिक्षकाची आत्महत्या - पुणे शहर पोलीस

पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरिक्षकाने आत्महत्या ( Pune Police Sucide ) केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिल्पा चव्हाण ( Police Inspector Shilpa Chavan ) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस निरिक्षक आधिकार्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.

Shilpa Chavan
शिल्पा चव्हाण
author img

By

Published : Dec 31, 2021, 4:45 PM IST

पुणे : पुणे शहर पोलीस ( Pune City Police ) दलातील महिला पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव शिल्पा चव्हाण ( Shilpa Chavan Police Inspector ) आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरात ( Shantinagar area at Vishrantwadi )घडली आहे. या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Pune Crime : येरवडा परिसरात सराईत गुन्हेगारासह नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ( Pune Police Crime Branch ) सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रॅंचचा पदभार त्यांच्याकडे होता. मिळालेल्या माहितीनुसार आज त्यांचा स्टाफ त्यांना आणण्यासाठी विश्रांतवाडी येथील शांतीनगर येथे त्यांच्या गेला होता. तेव्हा बराचवेळ फोन लावल्यानंतर देखील त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.