ETV Bharat / state

All India Police Game : सुभाष पुजारी यांना मानाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब - award of Champion of Champions

71 व्या आँल इंडिया पोलीस गेम ( All India Police Game ) 2022 चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा भारतीय पोलीस दलामधील मानाचा किताब (Title of honor in the Indian Police Force ) पटकावून सर्वोत्कृष्ट बॅाडी बिल्डर होण्याचा मान मिळविला.

All India Police Game
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब
author img

By

Published : Nov 23, 2022, 12:54 PM IST

पुणे : 71 व्या आँल इंडिया पोलीस गेम ( All India Police Game ) 2022 चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल मिळवले. त्याच सोबत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा भारतीय पोलीस दलामधील मानाचा किताब (Title of honor in the Indian Police Force ) पटकावून सर्वोत्कृष्ट बॅाडी बिल्डर होण्याचा मान मिळविला. या कारणे देशभरात महाराष्ट्र राज्याची आणि अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब

मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड : सुभाष पुजारी यांनी या स्पर्धेसाठी मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ व कोअर जिम - खारघर या ठिकाणी सराव करीत आहेत. या स्पर्धेसाठी 36 संघानी व 2500 खेळाडुनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी त्यांना वर्ल्ड बॉडी बिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे,वर्ल्ड बॉडी बिल्डिंग लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, रागिणी पुजारी, सुदर्शन खेडेकर - डोंबिवली, सागर ढमाले इत्यादींचे विशेष मार्गदर्शन लाभले.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब प्रदान : यापूर्वी सुभाष पुजारी यांनी जुलेै २०२२ मालदिव येथे झालेलया मिस्टर एशिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. ताश्कंद-उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते. तसेच सलग दोनवेळा भारत श्री व महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. दरम्यान थायलंड पुकेट या ठिकाणी होणा-या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड करणेत आली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस श्री देवेंदर फडनवीस यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात मा. चंदकांत पाटील, मा. गिरिष महाजन या मंत्रीगणांची उपसथिती होती.

शासनाने मदतीचा हात पुढे करावा : राज्यभरातून अनेक खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. विशेषण म्हणजे परिस्थिती नसतानाही अतोनात मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावात आहेत. यासाठी शासनाने अशा खेळाडून्ना मदतीचा हात पुढे केला तर देशातील कानाकोपऱ्यातील खेळाडू देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच नाव कमवून देतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.