ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह - pune corona news

पिंपरी-चिंचवड शहरात आज ६ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात दोन तरुण, एका मुलीसह तीन महिलांचा समावेश आहे. हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी, मोशी, या परिसरातील आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : May 3, 2020, 11:18 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून पैकी एकाला आज घरी सोडण्यात आले आहे. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणखी जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड शहरात आज सहा जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात दोन तरुण, एका मुलीसह तीन महिलांचा समावेश आहे. हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी, मोशी, या परिसरातील आहेत. कोरोनामुक्त झालेला व्यक्ती पुण्यातील वडगाव शेरी येथील असून त्याच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची दोन्ही वेळची टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.

सील करण्यात येणारे परिसर खालीलप्रमाणे -

दरम्यान, आज मध्यरात्रीपासून शहरातील पिंपळे सौदागर येथील ( पकवान स्विट्स - कुणाल आयकॉन रोड - ओम दत्तराज मंदिर - रोज वुड सोसायटी- सोमनाथ स्नॅक्स सेंटर ओम चैतन्य दुध डेअरी - एम.एस.ई.बी. ऑफिस - पकवान स्विट्स ) व इंदिरानगर, चिंचवड येथील ( महिंद्रा टू व्हीलर्स शोरुम -सरस्वती को.ऑप.बॅक सायन्स पार्क - वीएसाएनएल कॉटर्स - महिंद्रा टू व्हीलर्स शोरुम ) येथील परिसर त्याचबरोबर डबल ट्री हॉटेल - कॉर्पोरेशन बॅक ए.एम.एम. एस.आयबीएमआर कॉलेज - तेजस एन्टरप्रायजेस परिसर सील करण्यात येणार असून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.