ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सोव, शिवनेरी गडावर तरुणाईची तुडूंब गर्दी

author img

By

Published : Feb 19, 2019, 1:37 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. या जन्मोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई शिवनेरी गडावर जल्लोषासाठी जमा झाली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर उत्साहाचे वातावरण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सोव

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. या जन्मोत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई शिवनेरी गडावर जल्लोषासाठी जमा झाली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर उत्साहाचे वातावरण आहे.
रात्री १२ वाजल्या पासून शिवनेरी गडावर बाल शिवबाच्या आगमनासाठी प्रत्येकाचे डोळे आतुर झाले आहेत. आज मंगळवार सकाळी बाल शिवबाचे अंगाई गीत गाऊन जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी 'हर हर महादेव', छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. हातात भगवा, पुढे ज्योत आणि छत्रपतींच्या जन्माचा आजचा आनंद तरुणाईला एक वेगळी ताकद देत आहे. शिवनेरी गडावर बाल शिवबाच्या आगमनासाठी ढोल-लेझीम तलवारबाजी असे विविध खेळ या ठिकाणी सादर करण्यात येत आहेत.

Intro:Anc--संपूर्ण देशाचे दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा होत असून संपूर्ण महाराष्ट्रातून तरुणाई शिवनेरी गडावर ती जल्लोष करत आहे किल्ले शिवनेरी गडावर शिवबा चे आगमन होत असल्याने याठिकाणी वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे चला पाहूया

open song....

रात्री बारा वाजल्या पासून शिवनेरी गडावर बाल शिवबाच्या आगमनासाठी प्रत्येकाचे डोळे आतुर झाले आहे आज सकाळी बाल शिवबाचे अंगाई गीत गाऊन जन्मोत्सव सोहळा साजरा केल्या जात आहे

हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराज की जय.. या घोषणांचा आवाज किल्ले शिवनेरी गडावर ती घुमत असून हातात भगवा पुढे ज्योत आणि छत्रपतींच्या जन्माचा आजचा आनंद तरुणाईला एक वेगळी ताकद देत असून शिवनेरी गडावर ती बाल शिवबाच्या आगमनासाठी ढोल-लेझीम तलवारबाजी असे विविध खेळ या ठिकाणी सादर केले जाणार आहे

Body:।।

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.