ETV Bharat / state

शरद मोहोळ हत्या प्रकरण : पोलिसांनी 8 आरोपींना 'फिल्मी स्टाईल' केली अटक

Sharad Mohol Mudrer Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केलीय. शिरवळजवळ पळून जात असताना पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलंय.

Sharad Mohol Mudrer Case
Sharad Mohol Mudrer Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 9:14 AM IST

पुणे Sharad Mohol Mudrer Case : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आठ आरोपींना 'फिल्मी स्टाईल' अटक केलीय. शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी शरद मोहोळवर गोळीबार करत हत्या केल्याचं पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय.

पुणे सातारा रोडवर पाठलाग करत आरोपींना घेतलं ताब्यात : शरद मोहोळच्या हत्येनंतर कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथकं पुणे शहर परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेनं रवाना करण्यात आली होती. तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पुणे सातारा रोडवर किकवी - शिरवळ दरम्यान पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन 8 आरोपींना पकडलंय. पुणे शहर गुन्हे शाखेनं ही कारवाई करुन घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आणि 2 चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मोहोळवर मारेकऱ्यांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळला गोळी लागल्यावर त्याला पुण्यातील वनाज इथं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळतेय. अशातच पुण्यातील कोथरुड इथं अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या गँगवॉर झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलं जात आहे. अशातच लग्नाच्या वाढदिवशीच शरद मोहोळवर गोळीबार झाल्यामुळं प्रचंड खळबळ उडालीय.

हेही वाचा :

  1. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  2. गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गेम; लग्नाच्या वाढदिवसालाच भयावह शेवट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.