पुणे: माणसाला आयुष्यात कशाची तरी भीती असते. ही भीती घालवण्यासाठी कोणीही काहीही करू शकतो. एखाद्या गोष्टीची भीती वाटणारी व्यक्ती त्यापासून लवकर सुटत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली यांनी वयाच्या ७० व्या वर्षी १६०० फूट उंचीवरून पॅरा-जम्पिंग (parajump) करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली यांनी पॅराशूट ब्रिगेड फेस्टिव्हल रियुनियन (Parachute Brigade Festival Reunion) 2022 चा भाग म्हणून आग्रा येथे हे पॅरा जंपिंग केले. यावेळी त्यांच्यासोबत 35 लोक सहभागी झाले होते. गिरिजा शंकर मुंगली ७० वर्षांचे सर्वात वृद्ध आहेत. त्यांनी 1600 फूट उंचीवरून पॅरा जंपिंग केले. निर्भयता हे धैर्य असते, असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.