पुणे : महाराष्ट्रामध्ये आज संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वेगवेगळे वक्तव्य करून, महाराष्ट्र अशांत ठेवण्याचे काम केले जात आहे. संविधानिक पदावर बसलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) देशातल्या कुठल्याच पदावर बसायच्या पात्रतेचे नाहीत. त्यांना तात्काळ त्या पदावरून दुर करण्यात यावे आणि छत्रपतीचा अपमान थांबवावा, अशी मागणी आम्ही करत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज अखरे यांनी आज पुण्यात केली आहे.
अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन - पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोज अखरे बोलत होते. भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या माध्यमातून जाणीवपूर्वक असा वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात समाजाचे पडसाद पाहून मग त्यावर प्रतिक्रिया बघितली जाते. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान संभाजी ब्रिगेड कधीही सहन करणार नाही. येणाऱ्या काळात जर असं होणार असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलने आंदोलन करेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल संभाजी ब्रिगेड यांनी म्हटलेला आहे.
राज ठाकरे सुपारी घेतात का? - राज ठाकरे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांची सुपारी घेऊन बोलतात का असा प्रश्न आम्हाला आहे ? कारण ज्यावेळेस आम्ही भांडारकर संस्थेवर आंदोलन केले. त्यावेळेस राज ठाकरे यांनी मेहेंदळे इतिहासकार आहेत. त्यांची जाऊन माफी मागितली. ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. त्यावेळेस राज ठाकरे पुढे येतात. मग ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाबतीत असो किंवा मेहेंदळे यांच्या बाबतीत असो. त्यामुळे राज ठाकरे सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या सुपाऱ्या घेतात, असा आमचा आक्षेप असल्याचे मनोज आखरे ( Sambhaji Brigade leader critics ) यांनी म्हटलेले आहे.
सावरकर माफीवीरच - सावरकरांना आम्ही माफीवीरच म्हणतो. सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हतेच. त्यामुळे आम्ही त्यांचा इतिहास वाचलेला आहे. जे पुस्तके वाचलेल्या चरित्र वाचलेला आहे त्यातून आणि आमच्या संशोधनातून हे समोर आलेल्या त्यामुळे त्यांच्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. पण ते माफीवीर आहेत स्वातंत्र्यवीर नाहीत. आणि आमच्यासाठी तो विषय माफीवीर एवढंच मर्यादित असल्याचेही यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोज अखरे यांनी म्हंटले आहे. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे उपस्थित होते.