पुणे- गेल्या महिन्याभरापूर्वी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरामध्ये बागायती जमिनीचे व शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, या पावसाचा ज्वारी शेतीला फायदा झाला आहे. ज्वारीचे उत्पादान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील डोंगराळ व जिरायती शेतीत रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेण्यात आले. दरम्यान, या हंगामात परतीच्या पावसाने सदर परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक भरदार फुलले आहे. त्यामुळे, यावर्षी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळणार असून यातून जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या वर्षी जनावरांच्या चाऱ्यासह धान्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात परतीच्या पावसाने बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र, कधी नव्हे ते जिरायत शेतीला चांगले दिवस आले असून रब्बी हंगामातील कडधान्य, ज्वारी अशी पिके भरदार फुलली आहे.
हेही वाचा- पंतप्रधान मोदी आज पुण्यात; पोलीस महासंचालक परिषदेला राहणार उपस्थित