बारामती(पुणे) - सहकारातील कारखानदारी तोट्यात आणून नातेवाईकांना कारखानदार बनविले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदार, जाहिगीरदारांच्या संपूर्ण गड्या उद्ध्वस्त केल्या आणि रयतेचे राज्य स्थापन केले. त्यामुळेच शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे खरे जाणतेराजे होते. मात्र आजच्या कारखानदारांनीच नवीन वतनदार जाहिगीरदार निर्माण केले आणि त्यांच्या नाते गोत्यांच्या बाजूने राज्याचे राजकारण फिरू लागले, अशी टीका राज्याचे माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी बारामतीत केली.
सहकारी कारखाने तोट्यात आणून नातेवाईकांना कारखानदार बनविले - सदाभाऊ खोत
शेतकरी आंदोलन शेतकर्यांच्या हिताचे राहिले नाही तर दिल्लीचे तक्त ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हे आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या तख्ताला रक्तरंजीत इतिहास आहे. त्यामुळे डावे पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये नक्षलवादी विचारांच्या व्यक्ती सक्रिय झाल्या आहेत. कृषी कायद्यात काही बदल अपेक्षित असल्याची प्रतिक्रियाही खोत यांनी दिली आहे.