पुणे Ram Temple Construction : पुण्यात श्रीरामाच्या वस्त्रांच्यासाठी 'दोन धागे श्रीरामासाठी' या उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले. श्रीरामाचा पोशाख पुण्यातून विणून घेण्यात येणार आहे. तो लोकसहभागातून विणता यावा यासाठी हा कार्यक्रम पुण्यात ठेवण्यात आला आहे. याचे उद्घाटन आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी गोविंदगिरी महाराज आज पुण्यातल्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. (Two Threads for ShriRam)
आमचा दृष्टिकोन भक्तीचा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मंदिर होत आहे, अशी चर्चा आहे. यावर बोलताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, जो तो ज्या त्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. आमचा दृष्टिकोन भक्तीचा आहे. आमच्यासाठी ती भक्ती आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून श्रीराम हे तंबूसारख्या झोपडीमध्ये राहत होते. त्यांना तिथून भव्य अशा पहिल्या मजल्याच्या जन्मस्थानावर लोकार्पण करावे, असा आमचा उद्देश आहे. त्यामुळे जो तो आपापल्या परीने विचार करत असेल. आमच्यासाठी राजकारण नाही तर भक्ती असल्याची प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.
बांधकाम सुरू असताना दर्शनाची व्यवस्था : राम मंदिर पूर्ण बांधण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. भारतात अशी आणखी मंदिरे झालेली आहेत. त्याचा पहिला मजला आता आपण बांधत आहोत. आणखी तीन मजली वरती बांधण्याचे काम आहे. वेगवेगळ्या देवस्थानाची प्रतिष्ठापनासुद्धा करायची आहे; परंतु एका तंबूसारख्या झोपडीतून श्रीरामांना त्यांच्या जन्मभूमीवर विराजमान करण्यासाठी 22 तारखेला हा भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर बांधकाम सुरूच राहील. हे काय गणेश मंडळाचे बांधकाम नाही. त्यामुळे हे काम भव्य दिव्य होण्यासाठी त्याला वेळ लागेल. ते सुरू राहील त्यावेळेस दर्शन मात्र घेता येणार असल्याचेसुद्धा गोविंदगिरी महाराज म्हणाले आहे.
मंदिर उद्घाटनासाठी ही जय्यत तयारी : आपल्या संस्कृतीमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत ती मूर्ती असते. नंतर तो देव होतो. मोठा कार्यक्रम असल्याने मंदिर तोपर्यंत पूर्ण होत आहे. चंद्रपूरच्या सागवान लाकडांनी मंदिराची सगळी द्वारं बनविण्यात आलेली आहेत. प्रामुख्याने मुख्य प्रवेशद्वारासाठी लागणारे लाकूड चंद्रपूर येथून आणण्याचा कार्यक्रम झाला. रामाला लागणारे जे वस्त्र आहे ते आपण सगळ्यांनी विणलं पाहिजे अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली. त्यांचा स्वतःचा हातमाग आणि विणकामाचा मोठा व्यवसाय आहे. श्रीरामांच्या मंदिरामध्ये माझेही योगदान आहे आणि त्यामुळेच आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली, असा भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असला पाहिजे अशी प्रतिक्रिया उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.
हेही वाचा: