ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी आवकाळी पावसाचे आगमन - pune corona update

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना, नव्याने अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी खेड तालुक्यातील पश्चिम भागात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाचे आगमन झाले.

rain fall in pune
पुण्याच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी आवकाळी पावसाचे आगमन
author img

By

Published : Apr 30, 2020, 7:26 PM IST

Updated : Apr 30, 2020, 8:20 PM IST

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना, नव्याने अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी खेड तालुक्यातील पश्चिम भागात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी आवकाळी पावसाचे आगमन
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतात पिकवलेला शेतमाल सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांदा बाजरी, भुईमुग अशी सर्व पिके पावसाने भिजली आहेत.सध्या प्रत्येक नागरिक लॉकडाऊन आहे. मात्र, शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करत कांदा, बाजरी, भुईमुग काढणी करत आहे. लॉकडाऊन काळात मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील नागरिकांच्या मदतीने शेतमालाची काढणी सुरू असताना, अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान होत असून शासकीय पातळीवर अवकाळी पाऊस झालेल्या भागाची नुकसानीची पाहणी करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

Last Updated : Apr 30, 2020, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.