ETV Bharat / state

कोरोनाच्या उपचारासाठी आर्थिक मदत; पुणे जिल्हा परिषदेची देशातील पहिलीच योजना

author img

By

Published : May 9, 2020, 9:46 PM IST

'डॉ. रुखमाबाई राऊत फायनान्शियल अँड प्रोग्रॅम फॉर कोव्हिड 19' असे या योजनेचे नाव असून शुक्रवारी 8 मे रोजी ही योजना कार्यान्वित झाली आहे. भारताच्या पहिल्या महिला डॉकटर रुखमाबाई राऊत यांच्या सन्मानार्थ या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी आर्थिक मदत ; पुणे जिल्हा परिषदेची देशातील पहिलीच योजना

पुणे - जिल्ह्यातील कोव्हिड-19 रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचारासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आर्थिक मदत योजनेची व्यवस्था करून देण्यात आली आहे. कोरोना हा आजार कुठल्याच सरकारी किंवा खासगी आरोग्य विमा योजनमध्ये येत नाही. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेने आणलेली ही स्कीम ही देशातील अशाप्रकारची पहिलीच योजना आहे.

पुणे जिल्ह्यात 22 मार्चला कोव्हिड 19 साथ रोग म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्यात रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कोरोनावर उपचार मोफत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ही आर्थिक मदत योजना आणण्यात आली आहे. 'डॉ. रुखमाबाई राऊत फायनान्शियल अँड प्रोग्रॅम फॉर कोव्हिड 19' असे या योजनेचे नाव असून शुक्रवारी 8 मे रोजी ही योजना कार्यान्वित झाली आहे. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर रुखमाबाई राऊत यांच्या सन्मानार्थ या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये या योजने अंतर्गत येणार आहेत.

मदतीचे स्वरूप -

1) कोव्हिड-19 संसर्ग झालेला मात्र कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी 25 हजार रुपये
2) कोव्हिड-19 संसर्ग झालेला आणि थोडी लक्षणे व त्रास आलेल्या रुग्णासाठी 50 हजार रुपये
3) कोव्हिड-19 संसर्ग झालेला आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासाठी 75 हजार रुपये
4) अत्यंत गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी 1 लाख रुपये

अशाप्रकारे या योजनेतील मदतीचे स्वरूप असणार आहे. जिल्हा परिषदेने 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'च्या माध्यमातून ही योजना राबवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.