पुणे - पुणे पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून 50 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 10 लाख एवढी आहे. आरोपी विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा
दरम्यान, बुधवारी देखील पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गोपनीय माहितीवरून महिंद्रा एक्स.यू.व्ही. गाडीतून चरस घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली होती. हा व्यक्ती नाशिकमार्गे पुण्याकडे येत होता. विरेंद्र घांथुराम शर्मा (वय ४०) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने गाडीच्या मागील दरवाजाच्या बाजूस टफच्या कुशनमध्ये एका कापडी पिशवीत १ किलो ९०५ ग्राम चरस लपवला होता. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार एवढी आहे. शर्मावर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - राज्यपालांना विमान नाकारणे हे कद्रुपणाच लक्षण - चंद्रकांत पाटील