पुणे : खिडकीतून घरात प्रवेश करत परदेशी बनावटीच्या पिस्तूल व जिवंत काडतुसे, महागडी घड्याळे, 4 तोळे वजनाची सोन्याची चैन, दोन लाख रुपये रोख रक्कम अशी घरफोडी मोहम्मद इरफान उर्फ उजाला याने केली होती. त्याबाबत चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करतानाच हा रॉबिनहूड, मोहम्मद इरफान, पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे.
महागड्या कार चोरायचा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद इरफान हा साथीदारसह विविध राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जात असे. हाय प्रोफाईल बंगलो सर्च करून महागड्या कार चोरायचा. त्याच्याविरुद्ध, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब ,गोवा, तामिळनाडू येथे घरफोडीचे असे एकूण 27 गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यासोबतच आरोपी सुनील यादव विरुद्ध गँगस्टर होता. पुणे शाखेने आरोपीच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुणे शाखेकडून तीन पथक तयार : पुणे शाखेकडून तीन पथके तयार करण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी एका जॅग्वार कार आरोपीने गुन्हा करताना वापरल्याचे दिसून आले. सदर कारवर आरोपीने बनावट नंबर प्लेटचा वापर केला होता. पुणे ते नाशिकपर्यंत दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून गुन्हात वापरलेल्या जॅग्वार कारचा खरा नंबर प्राप्त केला. त्यानंतर आरोपी मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ विनोदला अटक केली. त्यानंतर सुनील यादव, पुनीत यादव, राजेश यादव, यांना उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.
पोलिसांना गुंगारा : एक पथक तातडीने गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे गेले होते. मुख्य आरोपी मोहम्मद इरफान त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता. तो जालंधर राज्य पंजाब येथे असल्याची माहिती मिळताच. पथक तेथे दाखल झाले. परंतु आरोपी हा पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. फेब्रुवारी 23 रोजी पथकाने बिगारी कामगारांचे वेशांतर करून आरोपीच्या घराजवळ सापळा रुचून त्याला शिताफिने ताब्यात घेतले. आणि आरोपीने वापरलेली जॅग्वार कार, चोरी केलेले पिस्तूल , सोन्याचे दागिने, हस्तगत केले.
पोलिसांची कारवाई : ही कारवाही श्री रामनाथ पोकळे पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे पोलीस उपआयुक्त, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त , नारायण शिरगावकर, सुनील पवार, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, गणेश माने, अजय वाघमारे पोलीस निरीक्षक, विकास जाधव, नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार, विजय गुरव, अस्मल आत्तार, शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, अमोल आव्हाड, सारस साळवी, हरीश मोरे, प्रवीण भालचिम, राजेंद्र लांडगे, विनोद महाजन, अशोक शेलार, संजय आधारे, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे, वरिष्ठाच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे केलेली आहे.