पुणे : काेराेनाकाळात शासनाकडून महापालिकेला काेराेना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन किट’ प्रकरणात माेठा घाेटाळा (fraud in rapid antigen kit in corona test) उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पाेलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पाेलिसांनी महापालिकेला दिले (Pune Municipal Corporation found fraud) आहे.
बाेगस रुग्णांच्या नाेंदी : वारजे येथील महापालिकेच्या डाॅ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री केली. त्याजागी तब्बल ११ हजारांहून अधिक बाेगस रुग्णांच्या नाेंदी केल्याचा व त्यांना एसएमएस जाऊ नये, म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नाेंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Rapid Antigen Kit Fraud) आहे.
प्राथमिक तपास : या घाेटाळ्यातून ३४ लाख रुपये या केंद्रावरील डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे वारजे माळवाडी पाेलीसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पाेलिसांनी महापालिकेला दिले आहे. तर, तक्रारदाराच्या मते ही रक्कम ८० ते ९० लाख रुपये (rapid antigen kit in corona test) आहे.
घोटाळा उघडकीस : या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश काेळसुरे यांनी आराेग्य यंत्रणेकडे व पाेलिसांसह ३२ ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फाेडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार व वारजे पाेलिसांच्या तपासानुसार हा घोटाळा उघडकीस आला (Pune Municipal Corporation) आहे.