ETV Bharat / state

'पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जनतेने 100 टक्के प्रतिसाद द्यावा' - दीपक म्हैसकर पुणे पत्रकार परिषद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या आवाहन केले आहे. त्याला सर्वांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केले आहे. यासोबतच ब्लड बँकेशी संबंधित लोकांची बैठक घेण्यात आली. रक्तसाठा कमी झाला आहे. म्हणून रक्तदान करताना 15 पेक्षा जास्त लोक एकावेळी येणार नाहीत ही काळजी घ्यावी, असे म्हणत रक्तदानसंबंधित सर्व सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दीपक म्हैसकर
दीपक म्हैसकर
author img

By

Published : Mar 21, 2020, 6:48 PM IST

पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या आवाहन केले आहे. त्याला सर्वांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन विविध निर्णय घेत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात काय मदत हवी आहे, ही माहिती त्यांना देण्यात आली. तसेच या परिस्थितीत ज्या वस्तूंची गरज आहे त्या मिळवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकरांनीही आज (शनिवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी त्यांनीदेखील येथील परिस्थिती जाणून घेतली आणि आम्ही त्यांना सर्व ती माहिती दिली. या आधारे केंद्र शासन योग्य तो निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - अफवांना बाजुला सारा; कोरोनासंबंधी अचूक माहितीसाठी WHOच्या या क्रमांकावर व्हॉट्सअ‌ॅप करा

यासोबतच ब्लड बँकेशी संबंधित लोकांची बैठक घेण्यात आली. रक्तसाठा कमी झाला आहे. म्हणून रक्तदान करताना 15 पेक्षा जास्त लोक एकावेळी येणार नाहीत ही काळजी घ्यावी, असे म्हणत रक्तदानासंबंधित सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरटीओ, पोलीस आयुक्त यांच्यासोबत शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू आहे. त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूची मागणी केली आहे. जनतेने स्वतः च्या सुरक्षेसाठी स्वतः ने स्वतः वर निर्बंध घालावे. प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहनही केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.