ETV Bharat / state

Pune Bandh : पुणे बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा ; दुपारपर्यंत असणार दुकाने बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदची हाक (bandh against governer Governor Koshyari) देण्यात आली आहे. या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार (Pune bandh supported by trade union) आहे.

Pune Bandh
पुणे बंद
author img

By

Published : Dec 9, 2022, 10:24 AM IST

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात (bandh against governer Governor Koshyari) आहे. त्या पार्श्वभूमीवर काल पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. येत्या 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक (Pune bandh) देण्यात आली होती. आत्ता या पुणे बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला असून दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील सर्वच दुकाने बंद असणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले आहे.

बंद ठेवून पाठिंबा : आज झालेल्या व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुणे बंदमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी तीनपर्यंत दुकाने बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले (bandh against Governor Koshyari) आहे.

आवाहनाला प्रतिसाद : संभाजी बिग्रेड कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,आर.पी.आय. या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले होते. आज या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने देखील या बंदला पाठिंबा जाहीर केला (Pune bandh supported by trade union) आहे.

बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे - ही बैठक कुठल्याही पक्षाची नसून शिवप्रेमी लोकांची आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिगेड संभाजी ब्रिगेड काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची तसेच अनेक मुस्लिम संघटना ही सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सर्व शिवप्रेमी संघटनांना शिवरायांच्या सन्मानार्थ या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले (trade union against governer) आहे.

बंदमध्ये विविध संघटना सहभागी - या बंदमध्ये संपूर्ण पुणे बंद असेल, त्यामध्ये सर्व लहानापासून थोर मोठ्या व्यक्तीने शिवाजी महाराज कुठल्याही जाती धर्माचे नसून शिवाजी महाराज हे एकत्रच प्रतीक आहे. त्यामुळे सर्वच लोकांनी आज सहभागी होऊन पुणे बंद करून एक आदर्श महाराष्ट्राला घालून द्यावा. अशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विनंती पुणेकर नागरिकांना केलेली आहे. संभाजी ब्रिगेड, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना या सर्व शिवप्रेमी संघटना काही मुस्लिम संघटनासुद्धा या बंदमध्ये सहभागी असणार आहेत, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे.

राज्यपालांची हाकालपट्टी करण्याची मागणी - छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी ( Demand for ouster of Governor Koshyari ) केलेली आहे. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही सरकारकडून करण्यात येत नसल्याने या बंदची हाक देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.