ETV Bharat / state

मेहरबानी करून जीवनात कधीच कोर्टाची पायरी चढू नका, अजित पवारांचा मोलाचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजित पवार

'तुम्हाला विनंती करतो की मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका', असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Oct 2, 2021, 1:48 PM IST

बारामती : 'शेतीच्या व राहत्या घराशेजारील मोकळ्या जागेच्या वादातून शेजाऱ्यांसह कुटुंबातील सध्या नातेवाईकांमध्ये टोकाचे वाद निर्माण होत आहेत. पुढे अनेक जण या वादामुळे पिढ्यान् पिढ्या एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. याचे वाईट वाटते. अशा वादातून अखेर कोर्टाची पायरी चढली जाते. कोर्टात गेल्यानंतर वकील एका गटाला तुमच्याच बाजूने निकाल लागेल, असे सांगतात. तर दुसऱ्या गटालाही 100 टक्के तुमच्याच बाजूने निकाल लागेल, असे सांगतात. वकील हे त्यांचे काम करत असतात. त्यामुळे कधीच कोर्टाची पायरी चढू नये. ते खरंही आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका', असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला.

अजित पवारांचा मोलाचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (2 ऑक्टोबर) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्या प्रतिष्ठान येथे डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटपाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

"तलाठी काळा बाजार करायचे"

'पूर्वी आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊ साहेबांचाचा थाट असायचा. त्यावेळी काही भाऊसाहेबांनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केले. त्याकाळी भाऊ साहेबांचा मोठा दरारा असायचा. पुढे काळ बदलत गेला. नवनवी आव्हाने समोर आली. आता सर्वत्र संगणकीकरण मोठ्या प्रमाणात झाले. तसेच कामात सुलभता आणण्याचा, वेळेची बचत करण्याचा व हेलपाटे मारु लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत' असेही अजित पवारांनी म्हटले.

हेही वाचा - एखादा शूटर लावा अन् मारून टाका, लेव्हल सोडून बोलू नका अन्यथा...; राष्ट्रवादी-शिवसेना नेते भिडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.