पिंपरी-चिंचवड (पुणे) - भात पिकाचे आगार असलेल्या मावळात मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका बसला. उभे असलेले भाताचे पीक या पावसाने आडवे झाले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याचे दुःख शेतकऱ्यांना आहे. यावर्षी पाऊस उशिरा झाला होता. मात्र, मावळ परिसरातील भात पीक जोमात आले. परंतु, ऐन काढणीच्या वेळी मुसळसधार पावसाने थैमान घातल्याने पीक आडवे झाले आहे.
मावळमध्ये मुसळधार पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान; हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला
बुधवारी रात्री झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेले उभे पीक आडवे झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
पुणे
पिंपरी-चिंचवड (पुणे) - भात पिकाचे आगार असलेल्या मावळात मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका बसला. उभे असलेले भाताचे पीक या पावसाने आडवे झाले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याचे दुःख शेतकऱ्यांना आहे. यावर्षी पाऊस उशिरा झाला होता. मात्र, मावळ परिसरातील भात पीक जोमात आले. परंतु, ऐन काढणीच्या वेळी मुसळसधार पावसाने थैमान घातल्याने पीक आडवे झाले आहे.
लोणावळ्यात 76 मिलिमीटर पावसाची नोंद
पिंपरी-चिंचवड, मावळसह लोणावळा शहरालादेखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. लोणावळ्यात बुधवारी रात्री 76 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला असून पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा परिसरात पर्यटन बंदी उठवल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.