पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील नाशिक फाटा उड्डाण पुलावर भरधाव दुचाकीने डंपरला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुनील कवीतके (रा. मुंढवा, पुणे), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आणि जखमी तरुण मद्यपान करून दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
मद्यपान करून भरधाव दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे मृत आणि जखमी हे मित्रांना भेटायला गेले होते. ते, परत मुंढवा येथे जात होते. त्यांनी मद्यपान केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून भरधाव वेगाने दुचाकीवरून पुण्याचे दिशेने जात असताना नाशिक फाटा उड्डाण पुलावर येताच दुचाकीवरील नियंत्रण सुटून पुढे असलेल्या डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली.
हेही वाचा - वाळू माफियांना पोलिसांचा पुन्हा दणका, स्फोटकाच्या साह्याने उडवल्या ५ यांत्रिक बोटी