पुणे - बुधवारीसायंकाळीआंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचेकाम करणाऱ्या मजुरांचा सहा वर्षाचा चिमुकलाबोरवेलमध्ये पडला होता.या चिमुकल्याच्या बचावकार्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर आज सकाळी या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलेआहे.
मंचर नारायणगाव मार्गे थोरांदळे गावातून नव्याने रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर काही मजूर काम करत होते. या मजुरांची मुले एका पडीक शेताच्या बाजुला असलेल्या बोरवेलजवळ खेळत असताना अचानक सहा वर्षाचा रवी बोरवेलमध्ये पडला. त्यानंतर या चिमुकल्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न असफल होत असताना एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्रभर या चिमुकल्याच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आले.अखेर आज सकाळीया चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता बागायती क्षेत्रामध्ये बोरवेल घेतले जात आहेत. मात्र या बोरवेललापाणी लागत नसल्याने बोरवेल झाकले जात नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
जीवन मरणाचा संघर्ष; चिमुकल्याला वाचवण्यासाठी १६ तास खडकाशी झुंजले एनडीआरएफचे जवान
रस्त्याच्या बाजुला खेळत असलेला चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. या चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले होते. अखेर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन या चिमुकल्याला बाहेर काढले.
पुणे - बुधवारीसायंकाळीआंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचेकाम करणाऱ्या मजुरांचा सहा वर्षाचा चिमुकलाबोरवेलमध्ये पडला होता.या चिमुकल्याच्या बचावकार्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर आज सकाळी या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलेआहे.
मंचर नारायणगाव मार्गे थोरांदळे गावातून नव्याने रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर काही मजूर काम करत होते. या मजुरांची मुले एका पडीक शेताच्या बाजुला असलेल्या बोरवेलजवळ खेळत असताना अचानक सहा वर्षाचा रवी बोरवेलमध्ये पडला. त्यानंतर या चिमुकल्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न असफल होत असताना एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्रभर या चिमुकल्याच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आले.अखेर आज सकाळीया चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता बागायती क्षेत्रामध्ये बोरवेल घेतले जात आहेत. मात्र या बोरवेललापाणी लागत नसल्याने बोरवेल झाकले जात नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचण्यास एनडीआरएफच्या टीमला यश
पुणे - आंबेगाव तालुक्यातील थोरांदळेमध्ये बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुलगा रवी याच्यापर्यंत पोहोचण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे.
रवी गेले अकरा तास बोरवेलमध्ये अडकला आहे. अकरा तासानंतर त्याच्यापर्यंत एनडीआरएफचे जवान पोहोचले असून डॉक्टरांच्या मदतीने त्याची तपासणी करण्यात आली. रवी सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुन्हा त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
बचावकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहेत. बोरवेलचा खड्डा लहान असल्याने त्याच्या बाजूच्या जमीनीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करावे लागत आहे. त्यामुळे रवीपर्यंत पोहोचणे अवघड होत आहे.
Conclusion: