ETV Bharat / state

'फडणवीस व राऊत भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहणे गैर'

ठाकरे सरकार तीन पक्षांना एकत्र येऊन राज्याचे प्रश्न हाताळत आहेत. अशातच अनेक वेळा हे सरकार टिकणार नसल्याचे वक्तव्य होत असताना राऊत आणि फडणवीस यांची बैठक राजकीय वर्तुळात खळबळ पसरुन गेली. मात्र, ही भेट राजकीयदृष्ट्या नसून सामना'च्या मुलाखतीसाठी घेण्यात आली असल्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

author img

By

Published : Sep 27, 2020, 4:42 PM IST

ncp leader dilip valse patil on devendra fadanvis sanjay raut meeting
फडणवीस व राऊत भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहणे गैर

पुणे - शिवसेनेचे खासदार संजय राऊत व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये गुप्त बैठक पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. या भेटीवर बोलताना कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की राऊत आणि फडणवीस यांची भेट ही राजकीय भेट नसून 'सामना'च्या मुलाखतीसाठी झाली आहे. या बैठकीला राजकीय स्वरूप देण्यात गैर असल्याचे मत दिलीप वळसे पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले हे तिन्ही पक्ष एकत्र येण्यामध्ये खासदार संजय राऊत यांची महत्वाची भूमिका पाहायला मिळाली. काल (शनिवारी) राऊत आणि फडणवीस यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र, ही भेट राजकीयदृष्ट्या नसून मुलाखतीसाठी होती, असे दोन्ही बाजूने सांगण्यात आले.ठाकरे सरकार तीन पक्षांना एकत्र येऊन राज्याचे प्रश्न हाताळत आहेत. अशातच अनेक वेळा हे सरकार टिकणार नसल्याचे वक्तव्य होत असताना राऊत आणि फडणवीस यांची बैठक राजकीय वर्तुळात खळबळ पसरुन गेली. मात्र, ही भेट राजकीयदृष्ट्या नसून सामना'च्या मुलाखतीसाठी घेण्यात आली असल्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.